परभणी :पावणेतीन लाखांची चांदीची बॅग पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:07 IST2018-01-11T01:05:56+5:302018-01-11T01:07:23+5:30
मुंबई येथून सराफा व्यापाºयांना चादी विक्रीसाठी आलेल्या एका व्यापाºयाची ७ किलो चांदी असलेली बॅग चोरट्यांनी पळविल्याची घटना ९ जानेवारी रोजी सायंकाळी ७़१५ च्या सुमारास घडली़

परभणी :पावणेतीन लाखांची चांदीची बॅग पळविली
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मुंबई येथून सराफा व्यापाºयांना चादी विक्रीसाठी आलेल्या एका व्यापाºयाची ७ किलो चांदी असलेली बॅग चोरट्यांनी पळविल्याची घटना ९ जानेवारी रोजी सायंकाळी ७़१५ च्या सुमारास घडली़
मुंबई येथील चांदीचे व्यापारी गिरीष बाबूभाई सोलंकी हे चांदी विक्री करण्यासाठी परभणीत आले होते़ ९ जानेवारी रोजी शहरातील सराफा व्यापाºयांकडे चांदीच्या दागिन्यांचे नमुने दाखविले़ त्यानंतर ७़१५ च्या सुमारास ते याच भागातील एका दुकानाच्या ओट्यावर थांबले असताना त्याच वेळी चोरट्यांनी चांदीचे दागिने असलेली बॅग चोरून नेली़ १० जानेवारी रोजी सोलंकी यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे़ २ लाख ८० हजार रुपयांची ७ किलो चांदी चोरट्यांनी चोरल्याचे तक्रारीत म्हटले आहे़ त्यावरून गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक नागनाथ सनगले तपास करीत आहेत़