परभणी : शॉर्टसर्किटने एक हेक्टर ऊस जळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:59 IST2019-01-29T00:59:11+5:302019-01-29T00:59:23+5:30
११०० के. व्ही. विद्मुत प्रवाहाची मुख्यतार तुटल्याने तालुक्यातील बाणेगाव येथील एका शेतकऱ्याचा एक हेक्टरवरील ऊस जळाल्याची घटना २७ जानेवारी रोजी दुपारी ३.०० च्या दरम्यान घडली. या ऊसाला ठिबक असल्याने ठिबकही जळुन खाक झाले आहे.

परभणी : शॉर्टसर्किटने एक हेक्टर ऊस जळाला
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : ११०० के. व्ही. विद्मुत प्रवाहाची मुख्यतार तुटल्याने तालुक्यातील बाणेगाव येथील एका शेतकऱ्याचा एक हेक्टरवरील ऊस जळाल्याची घटना २७ जानेवारी रोजी दुपारी ३.०० च्या दरम्यान घडली. या ऊसाला ठिबक असल्याने ठिबकही जळुन खाक झाले आहे.
नितिनकुमार बालाप्रसाद मालपानी यांची बाणेगाव शिवारात २ हेक्टर ४० आर जमीन आहे. या क्षेत्रात ठिबक करुन ऊसाची लागवड करण्यात आलेली आहे. या शेतातून हादगाव येथून मंजरथला जाणारी ११०० के.व्ही ची मोठी लाईन गेलेली आहे. २७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता या लाइनची तार तुटल्याने ऊसाला आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. ही लागलेली आग पाहून शेजारचे शेतकरी बन्सी काठवडे, विठ्ठल आढाव, पाडुरग थावरे, अनिल देवणे, भाऊराव पाटील यानी धाव घेवून आग विझविण्याचे प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येईपर्यंत जवळपास अडीच एकर ऊस जळुन खाक झाला होता. तसेच ठिबक संच ही जळाल्याने शेतकºयाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने मदत करावी, अशी शेतकºयाची मागणी आहे.