शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

परभणी : शिवसेना-भाजपा युतीने बदलली समीकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:57 IST

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाने राज्यस्तरावर युती केल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असून, यामुळे काही जणांची गोची झाली आहे तर काहींना अन्य मार्ग पत्कारावा लागणार आहे़

अभिमन्यू कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाने राज्यस्तरावर युती केल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असून, यामुळे काही जणांची गोची झाली आहे तर काहींना अन्य मार्ग पत्कारावा लागणार आहे़सध्याच्या घडामोडीनंतर जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा विधानसभा मतदार संघनिहाय आढावा घेतला असता शिवसेना-भाजपाच्या युतीने काही जणांचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे़ २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे काही नेते भाजपात गेले होते़ त्यानंतर झालेल्या परभणी विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांच्यातच थेट लढत झाली होती़ त्यावेळी शिवसेनेचे आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी भाजपाचा दणदणीत पराभव केला होता़ त्यानंतर गेल्या पाच वर्षांत आ़ पाटील यांनी मतदार संघात भाजपाची सातत्याने गोची केली आहे़ दुसरीकडे त्यांचे संघातील पदाधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत़ या पार्श्वभूमीवर आता भाजपा-शिवसेनेची युती झाल्याने भाजपात गेलेल्या काही नेत्यांची गोची झाली आहे़ त्यामुळे भाजपातील काही नेते काँग्रेसमध्ये परतणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे़ परभणी विधानसभा मतदार संघ आघाडीतील जागा वाटपानुसार काँग्रेसकडे असल्याने भाजपावासी नेत्यांना घरवापसीतून पुन्हा एकदा काँग्रेसच्या तिकिटाची अपेक्षा वाटू लागली आहे़ यातील सत्यता लोकसभा निवडणुकीतील प्रचारावरूनच स्पष्ट होणार आहे़पाथरी विधानसभा मतदार संघातही आ़ मोहन फड यांच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ युतीच्या पूर्वीच्या जागा वाटपानुसार पाथरीची जागा शिवसेनेकडे आहे आणि शिवसेनेला कंटाळूनच आ़ फड हे भाजपात गेले आहेत़ आता शिवसेना-भाजपाची युती झाल्याने ते पाथरीची जागा शिवसेनेकडून सोडून घेऊन भाजपाकडूनच लढतात की गेल्या वेळी प्रमाणे मित्र मंडळाच्या माध्यमातून निवडणूक लढतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे़ पाथरी मतदार संघात आ़ फड यांच्या व्यतिरिक्त भाजपाची फारशी ताकद नाही़ त्यामुळे आ़ फड यांच्या पक्षात आसण्याचा भाजपाला फायदा आहे़गंगाखेड विधानसभा मतदार संघाची जागा, युतीतील जागा वाटपानुसार भाजपाचा मित्र पक्ष रासपकडे आहे़ गंगाखेड शुगरचे चेअरमन रत्नाकर गुट्टे हे पुन्हा एकदा रासपकडून येथे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. असे असले तरी त्यांना स्थानिक भाजपा नेत्यांकडून कितपत सहकार्य मिळेल, या विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे़ गंगाखेड नगरपालिकेत भाजपाच्या सहकाºयानेच रासपच्या उपनगराध्यक्षांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पायउतार केले होते़ ही सल गुट्टे यांच्या मनात आहे़ त्यामुळे ते भाजपा नेत्यांशी कितपत जुळून घेतात, या विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे़जिंतूर विधानसभा मतदार संघात माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांच्यामुळे भाजपा मजबुत स्थितीत आहे़ त्यामुळेच राष्ट्रवादीचे आ़ विजय भांबळे आणि माजी आ़ बोर्डीकर यांच्यातच मतदार संघाचे राजकारण सातत्याने रंगत असते़ गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत बोर्डीकर यांनी शिवसेनेचे खा़ बंडू जाधव यांना उघडपणे मदत केली होती़ त्याचा खा़ जाधव यांना फायदाही झाला़ आता बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर याच लोकसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत़ तशी त्यांनी भाजपाकडून तयारीही सुरू केली होती़ आता शिवसेना-भाजपाची युती झाल्याने मेघना बोर्डीकर या भाजपात राहून विधानसभेची तयारी करणार की भाजपातून बाहेर पडून इतर पक्षांचे तिकीट मिळवून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे़चारही विधानसभा मतदार संघावर परिणामजिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात शिवसेना- भाजपाच्या राज्यस्तरावरील युतीचा परिणाम होणार आहे़ परभणी लोकसभेची जागा शिवसेनेकडे असल्याने शिवसेनेलाच भाजपाच्या मदतीची गरज लागणार आहे़ त्यामुळे भाजपाचे नेते शिवसेनेला कितपत मदत करतील, हेही पाहावे लागणार आहे़ भाजपाच्या काही नेत्यांचे खा़ जाधव यांच्याशी मतभेद आहेत़ आता हे मतभेद दूर ठेवून दोन्ही पक्षांचे नेते लोकसभेचे काम करणार की पडद्यामागे राहून खेळी करणार हा उत्सुकतेचा विषय बनला आहे़ गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची परभणीत सभा झाली होती़ यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत कोण-कोणत्या राष्ट्रीय नेत्यांच्या सभा होतात, याकडेही कार्यकर्त्याचे लक्ष लागले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूक