परभणी : राणे यांच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:43 IST2019-01-18T23:42:42+5:302019-01-18T23:43:07+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी परभणी येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास निलेश राणे यांच्या पुतळ्यास जोडेमारो आंदोलन करण्यात आले.

परभणी : राणे यांच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी परभणी येथे शिवसेनामहिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास निलेश राणे यांच्या पुतळ्यास जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथे शिवसेनेच्या परभणी विधानसभा महिला आघाडीच्या संघटक अंबिका डहाळे यांच्या नेतृत्वात दुपारी २.३० वाजेच्या सुमारास महिला जमल्या. यावेळी निलेश राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर संघटक कुसूम पिल्लेवाड, सविता मठपती, कमल कासले, वर्षा काळे, सुनिता कांबळे, कविता अंदुरे, अनिता खिस्ते, गंगाबाई मांडे, आरती वाघ, प्रिया देशपांडे, वैशाली सामाले आदींची उपस्थिती होती.