परभणी : शेतकरी कुटुंबियांना शिलाई मशीन वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 12:42 AM2019-03-02T00:42:07+5:302019-03-02T00:42:14+5:30

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने गरिबी निर्मूलन योजनेंतर्गत शुक्रवारी शहरातील श्री मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना २१ शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

Parbhani: Shilling Machine Distribution to Farmers' Families | परभणी : शेतकरी कुटुंबियांना शिलाई मशीन वाटप

परभणी : शेतकरी कुटुंबियांना शिलाई मशीन वाटप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने गरिबी निर्मूलन योजनेंतर्गत शुक्रवारी शहरातील श्री मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना २१ शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी यांची तर उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी पी. शिव शंकर तर प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा विधी प्राधिकरणचे सचिव शेख अकबर शेख जाफर, अ‍ॅड. दीपक देशमुख, तहसीलदार विद्याचरण कडवकर, कपील माले, डॉ.सुरवसे, डॉ.सय्यद ,डॉ. कदीर, डॉ. पाटील आदींची उपस्थिती होती.
यावेळी प्रास्ताविकात प्राधिकरणचे सचिव शेख यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत गरिबी निर्मूलन योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश जोशी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. जीवन पेडगावकर यांनी तर आभार प्रदर्शन अ‍ॅड. एस.एस. जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अ‍ॅड. मुजाहेद, अ‍ॅड. वाघमारे, अ‍ॅड. बलसेकर, गिराम, दिवाण आदींची परिश्रम घेतले.

Web Title: Parbhani: Shilling Machine Distribution to Farmers' Families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.