परभणी : सरपंचावर चौघांकडून प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:35 IST2018-05-14T00:35:12+5:302018-05-14T00:35:12+5:30

विकास कामे बोगस केल्याचा आरोप करीत अधिग्रहण केलेल्या बोअरच्या बिलाच्या कारणावरून एका सरपंचावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी चौघांविरूद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़

Parbhani: A serial attack by four from Sarpanch | परभणी : सरपंचावर चौघांकडून प्राणघातक हल्ला

परभणी : सरपंचावर चौघांकडून प्राणघातक हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा : विकास कामे बोगस केल्याचा आरोप करीत अधिग्रहण केलेल्या बोअरच्या बिलाच्या कारणावरून एका सरपंचावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी चौघांविरूद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़
तालुक्यातील आहेरवाडी येथे १० मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सरपंच पंडितराव मोरे यांना सूर्यभान बाबुराव मोरे, तुकाराम उर्फ बाबुराव सूर्यभान मोरे, जगन सूर्यभान मोरे आणि बबन बाबुराव खंदारे यांनी मारहाण केली़ अंतर्गत रस्ते, शाळेची संरक्षण भिंत ही कामे बोगस केल्याचा आरोप करीत बोअर अधिग्रहणाचे बिल स्वत: काढून घेण्याच्या कारणावरून ही मारहाण झाल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे़
या प्रकरणी १३ मे रोजी पंडितराव मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूद्ध पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे़ पोलीस निरीक्षक सुनील ओव्हळ हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत़

Web Title: Parbhani: A serial attack by four from Sarpanch