परभणी : सतरा हजारांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:50 PM2019-08-12T23:50:06+5:302019-08-12T23:50:36+5:30

बकरी ईदनिमित्त ड्राय डे असतानाही चोरुन दारु विक्री करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई करीत चार आरोपींच्या ताब्यातून देशी व विदेशी दारुच्या २९२ बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.

Parbhani: Seized liquor worth seventeen thousand | परभणी : सतरा हजारांची दारू जप्त

परभणी : सतरा हजारांची दारू जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : बकरी ईदनिमित्त ड्राय डे असतानाही चोरुन दारु विक्री करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई करीत चार आरोपींच्या ताब्यातून देशी व विदेशी दारुच्या २९२ बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.
शहरातील खानापूर फाटा येथील अंबाभवानी नगरात आरोपी राहत्या घरी देशी दारुची चढ्या भावाने विक्री करीत असताना पोलिसांनी छापा टाकला. तसेच पाथरी रोडवरील अक्षय ढाब्यासमोर एका रस्त्यालगत मॅकडॉल नं.१ दारु चढ्या भावाने विक्री करीत असताना आरोपीस पकडण्यात आले. तिसरी कारवाई गुरु गोविंदसिंग नगर येथे आणि चौथी कारवाई अंबाभवानी नगरातील कॅनॉललगत करण्यात आली. या प्रकरणी नवा मोंढा, कोतवाली आणि नानलपेठ पोलीस ठाण्यात चारही प्रकरणांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक आर. रागसुधा, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नरेश सिरसकर, हनुमंत जक्केवाड, नीलेश भुजबळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक छगन सोनवणे, संजय घुगे, संजय शेळके, बालाजी रेड्डी, अनिल हिंगोले, कुरवारे, मधुकर चट्टे, सुरेश कापसे, राख, गणेश कौटकर, अरुण पांचाळ, आशा सावंत, सय्यद मोईन, शिवा धुळगुंडे, भगवान भुसारे, हरिश्चंद्र खुपसे, सय्यद मोबीन, सारिका धोत्रे, राजेश आगासे, परमेश्वर शिंदे, जमीर फारोखी आदींनी केली. कारवाईमुळे अवैध दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
या आरोपींविरुद्ध नोंदविला गुन्हा
४ या कारवायांमध्ये सिद्धार्थ हरिभाऊ खाडे (रा. अंबाभवानी नगर, खानापूर फाटा), श्रावण यलप्पा गायकवाड (रा.अंबा भवानीनगर, परभणी), ओमकेश दिनकर गुट्टे (रा.परभणी)
४ आणि गुजरसिंग मेहताब सिंग टाक (रा.गुरु गोविंदसिंह नगर, परभणी) यांच्या ताब्यातून मॅकडॉल नं.१ च्या २५ बाटल्या व देशी दारुच्या २६७ बाटल्या अशा एकूण २९२ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या दारुची किंमत १७ हजार ९५४ रुपये एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Parbhani: Seized liquor worth seventeen thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.