परभणी : साई पादुका मिरवणूक आज परभणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:50 IST2018-11-27T00:49:48+5:302018-11-27T00:50:00+5:30
श्री साई भक्त सेवा मंडळाच्या वतीने श्री साई पादुका व रथ मिरवणूक २७ नोव्हेंबर रोजी परभणी शहरात दाखल होत आहे. चार दिवस शहरातील विविध भागात यानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

परभणी : साई पादुका मिरवणूक आज परभणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: श्री साई भक्त सेवा मंडळाच्या वतीने श्री साई पादुका व रथ मिरवणूक २७ नोव्हेंबर रोजी परभणी शहरात दाखल होत आहे. चार दिवस शहरातील विविध भागात यानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता पाथरी रोड येथील रामभाऊ रेंगे यांच्याकडे आरती व महाप्रसाद होईल. या ठिकाणाहून दिंडीचे प्रस्थान होणार असून सकाळी ८.३० वाजता जिजाऊनगरातील अॅड.राजकुमार भांबरे यांच्या निवासस्थानी आरती, ९.३० वाजता त्रिमूर्तीनगरातील साई मंदिर, १० वाजता सिंचननगरातील गणपती मोरे, दुपारी १२.३० वाजता सरस्वतीनगर येथील श्री साई मंदिर येथे आरती व महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर विविध ठिकाणी आरती व महाप्रसाद होणार असून सायंकाळी ७.३० वाजता रथ मिरवणूक गुजरी बाजारातील राजाराम मंगल कार्यालयात पोहोचणार आहे. यावेळी डॉ.टाकळकर यांच्या हस्ते आरती होईल. त्यानंतर गुजरी बाजार व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता राजाराम मंगल कार्यालयात आरती होणार असून साई पादुका शहरातील विविध भागात दाखल होतील. सकाळी ९ वाजता प्रल्हादराव कानडे, ९.३० वाजता नीलेश झरकर, १० वाजता गोविंदराव डहाळे, १०.३० वाजता संकेत शहाणे, सकाळी ११ वाजता गांधी पार्कातील बालासाहेब घिके यांच्याकडे आरती, महाप्रसाद होईल. ११.३० वाजता माळी गल्लीत श्री साई मंदिरात आरती होणार आहे. त्यानंतर देशमुख गल्ली, कारेगावरोड, शिवाजीनगर, वसमतरोडमार्गे मिरवणूक वैभवनगरातील एन.व्ही. अनंतवार यांच्या घरी पोहोचेल. त्या ठिकाणी मुक्काम होणार आहे. २९ नोव्हेंबर रोजी वैभवनगरात दीपक तलरेजा यांच्याकडे आरती त्यानंतर कारेगावरोडमार्गे गजानननगर, श्री साई मंदिर उघडा महादेव, येलदरकर कॉलनी मार्गाने पोस्ट कॉलनीतील साई मंदिरात ही साई पादुका व रथयात्रा पोहोचेल.
३० नोव्हेंबर रोजी जुना पेडगाव रोड, सहकारनगर इ. मार्गांनी ही रथयात्रा जाणार आहे.