शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

परभणी : ४४० कोटी रुपयांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 12:24 AM

यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी १७८३ कोटी ९१ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ ३० सप्टेंबरपर्यंत ८३ हजार ३८५ शेतकºयांना ४४० कोटी २७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी १७८३ कोटी ९१ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ ३० सप्टेंबरपर्यंत ८३ हजार ३८५ शेतकºयांना ४४० कोटी २७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे़परभणी हा कृषी व्यवसायावर अवलंबून असलेला जिल्हा आहे़ खरिप हंगामात मिळालेल्या उत्पादनातून शेतकरी आगामी वर्षाचे आर्थिक नियोजन करतात़ त्यामुळे खरीप हंगाम शेतकºयांसाठी आर्थिक वाहिनी म्हणून ओळखला जातो़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, सहकारी आणि खाजगी बँकांच्या माध्यमातून शेतकºयांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते़ या पीक कर्जासाठी शेतकरी मोठ्या आशा लावून असतात़ गतवर्षी जिल्ह्यातील बँकांनी शेतकºयांसाठी उद्दिष्टापेक्षा एक पाऊल पुढे टाकत १०७ टक्के पीककर्ज वाटप केले होते़ त्यामुळे गत खरीप हंगामात पीक कर्जाचा मोठा हातभार शेतकºयांना लाभला होता; परंतु, मागील वर्षी जिल्ह्यात सर्वसाधरण पाऊस झाल्याने जिल्ह्यातील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे़ त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली़ त्यातच ज्या शेतकºयांकडे कापूस पीक उपलब्ध होते़ त्या शेतकºयांच्या कापसावर बोंडअळीने हल्ला चढविला़ त्याचबरोबरच विमा कंपनीनेही शेतकºयांसोबत धोका करून विम्याच्या मदतीपासून वंचित ठेवले़यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला १७८३ कोटी ९१ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ यामध्ये ३० सप्टेंबरपर्यंत ८३ हजार ३८५ शेतकºयांना ४४० कोटी २७ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे़ यामध्ये व्यावसायिक बँकांनी २३ हजार ७७७ शेतकºयांना १७८ कोटी ७३ लाख रुपयांचे वाटप केले आहे़ खाजगी बँकांनी २ हजार ३७ शेतकºयांना २७ कोटी ३५ लाखांचे पीक कर्ज उपलब्ध करून दिले़महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १९ हजार ९५४ शेतकºयांना १४५ कोटी ६२ लाख, जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३७ हजार ३१७ शेतकºयांना ८८ कोटी ५७ लाख रुपयांचे वाटप केले आहे़ दरम्यान, या आकडेवारीवरून व्यापाºयांनी बँकांनी शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यात आखडता हात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे़ तसेच खरीप हंगाम संपून रबी हंगामाची तयारी जिल्ह्यातील शेतकºयांकडून सुरू आहे; परंतु, अद्यापही बँकांना जिल्ह्याला देण्यात आलेले १७८३ कोटी ९१ लाख रुपयांचे उद्दिष्ट गाठता आलेले नाही़ त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत कुठेतरी या वर्षी बँकांनी शेतकºयांना मदत करण्याऐवजी आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे़कर्जमाफी शेतकºयांच्या मुळावरमहाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ मध्ये अंमलात आणली़ या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जात आहे, असा मोठा गाजावाजा केला़ त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चही करण्यात आले़ शेतकºयांना ग्रामपंचायत, इंटरनेट व मोबाईल संदेशाद्वारे माहितीही देण्यात आली़ त्यामुळे आपले कर्जमाफ झाले या अपेक्षेने शेतकरी पीक कर्जासाठी बँकेत चकरा मारत आहेत; परंतु, राज्य शासनाने कर्जमाफी देताना काढलेले ढीगभर अध्यादेश पुढे करून पीक कर्ज देण्यासाठी बँकांकडून टाळाटाळ केली जात आहे़ त्यामुळे राज्य शासनाची कर्जमाफी सध्या शेतकºयांच्या मुळावर उठल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी