परभणी:दुचाकी अडवून चोरट्यांनी केली लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:29 IST2019-03-10T00:29:11+5:302019-03-10T00:29:33+5:30

पाथरी ते तुरा या रस्त्यावर दुचाकी अडवून एकास लुटल्याची घटना ७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Parbhani: The robbery made a robber by robbing a bike | परभणी:दुचाकी अडवून चोरट्यांनी केली लूट

परभणी:दुचाकी अडवून चोरट्यांनी केली लूट

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : पाथरी ते तुरा या रस्त्यावर दुचाकी अडवून एकास लुटल्याची घटना ७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुरा येथील सुदाम बाळासाहेब जगदाळे हे ७ मार्च रोजी रात्री पाथरी येथून गावाकडे जात होते. जगदाळे यांची दुचाकी गावाजवळ येताच तीन चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडवून जगदाळे यांच्या खिश्यातील पाचशे रुपये आणि पाच हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल हिसकावून घेतला. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलग दोन
दिवस चोऱ्या
४तालुक्यातील कासापुरी येथे ६ व ७ मार्च रोजी चोरीच्या सलग दोन घटना घडल्या. तर ८ मार्च रोजी रात्री बळीराम भानुदास कोल्हे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला. तालुक्यात चोरी आणि दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Parbhani: The robbery made a robber by robbing a bike