परभणी : पाच कोटींतून होणार रस्त्याची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 23:35 IST2019-11-24T23:34:44+5:302019-11-24T23:35:22+5:30
शहरातील रस्त्यांची समस्या दूर करण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या कामांना कार्यारंभ आदेश दिला असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली.

परभणी : पाच कोटींतून होणार रस्त्याची कामे
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील रस्त्यांची समस्या दूर करण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या कामांना कार्यारंभ आदेश दिला असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली.
आचारसंहिता आणि पावसाळ्यामुळे शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे थांबविली होती़ परंतु, ही कामे आता सुरू करण्यात आली आहेत़ ५ कोटी रुपयांच्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले असून, १ कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा काढल्या आहेत़ त्यामुळे लवकरच शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण होतील, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले़
दरम्यान, प्रभाग क्रमांक ५ मध्ये गरुड यांच्या घरापासून ते शिंदे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली होती़ त्यानुसार हे काम हाती घेण्यात आले आहे़ उघडा महादेव ते वसमत रोड आणि कारेगाव ते गंगा गॅस गोदाम या रस्त्याचे कामही येत्या दोन दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती शहर अभियंता वसीम पठाण यांनी दिली़ शहरातील रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाल्याने वाहनधारकांची खड्ड्यांच्या त्रासातून लवकरच मुक्तता होण्याची आशा निर्माण झाली आहे.