शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

परभणी : तालुक्यात बहरलेल्या पिकांना पावसाची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 11:33 PM

यावर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ६ हजार ३३० हेक्टर क्षेत्रावर तालुका कृषी विभागाने पेरणीचे नियोजन केले होते़ तालुक्यात कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर १ लाख ४ हजार ४१६ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे़ पेरणी केलेली पिके पूर्णपणे बहरात आहेत़ या पिकांना सध्या पावसाची नितांत गरज आहे; परंतु, पावसाळा सुरू होवून अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे़ या महिन्यातील पाऊस पाहता तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढविणाराच आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ६ हजार ३३० हेक्टर क्षेत्रावर तालुका कृषी विभागाने पेरणीचे नियोजन केले होते़ तालुक्यात कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर १ लाख ४ हजार ४१६ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे़ पेरणी केलेली पिके पूर्णपणे बहरात आहेत़ या पिकांना सध्या पावसाची नितांत गरज आहे; परंतु, पावसाळा सुरू होवून अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे़ या महिन्यातील पाऊस पाहता तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढविणाराच आहे़परभणी तालुक्यात सर्वसाधारणपणे नगदी पीक म्हणून ओळखले जाणाºया कापूस व सोयाबीन पिकांची सर्वाधिक पेरणी केली जाते़ काळ्या मातीने सुजलाम् सुफलाम असलेला हा तालुका सिंचनात मागे पडलेला आहे़ या तालुक्यातून दूधना, पूर्णा या प्रमुख नद्या प्रवाही आहेत; परंतु, गतवर्षी दुष्काळामुळे हिवाळ्यात या नद्यांचे पात्र कोरडेठाक पडले़ परभणी जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या निम्न दूधना प्रकल्पातून या दोन्ही उपद्यांच्या पात्रात पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे यावर्षीच्या जूनपर्यंत नदीकाठावरील ग्रामस्थांची तहान व काही प्रमाणात सिंचनाचा प्रश्न मिटला़यावर्षी खरीप हंगामात शेतकºयांनी तालुक्यात कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर पेरणी करण्यास सुरुवात केली़ ५ आॅगस्टपर्यंत तालुका कृषी विभागाने नियोजन केलेल्या १ लाख ६ हजार ३३० हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ४ हजार ४१६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली़ यामध्ये तूर १२ हजार ५५८, मूग ५३ हजार ५७ हेक्टर, उडीद ६ हजार ३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे़ त्याचबरोबर सोयाबीन ४८ हजार २५७, कापूस ३७ हजार ४४२ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आला आहे़ पेरणी केलेली पिके कमी अधिक पावसावर बहरली आहेत़ कापसाची चांगली वाढ झाली आहे तर सोयाबीन पीक शेंगा व फुल लागण्याच्या अवस्थेत आहे़ या पिकांना सध्या पावसाची नितांत आवश्यकता आहे; परंतु, मागील आठ दिवसांत तालुक्यात पावसाचा एक थेंबही बरसला नाही़ त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांची पिके जरी चांगली असली तरी पावसाची प्रतीक्षा मात्र पावसाळा सुरू होवून अडीच महिन्यानंतरही कायम आहे़ त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांच्या नजरा दमदार पावसासाठी आकाशाकडे लागल्या आहेत़सिंचनासोबत जनावरांच्या चाºयाचा प्रश्न ऐरणीवरपरभणी तालुक्याची पावसाची सरासरी ८६२़६० मिमी आहे़ १ जूनपासून ते १६ आॅगस्टपर्यंत तालुक्यात केवळ २४५़४६ मिमी पाऊस झाला आहे़ टक्केवारीच्या तुलनेत तालुक्यात आजपर्यंत ४८़ ६० टक्के पाऊस होणे अपेक्षित होते; परंतु, १७ आॅगस्टपर्यंत तालुक्यात केवळ ३०़६ टक्के पाऊस झाला आहे़ त्यामुळे पावसाळ्याचे अडीच महिने संपले तरीही १८ टक्के पाऊस कमी झाला आहे़ त्यामुळे तालुक्यात शेती सिंचनाबरोबराच जनावरांच्या चाºयाचा व तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ त्याचबरोबर मध्यम लघु प्रकल्पासह दूधना व पूर्णा या प्रवाही नद्यांच्या पात्रातही एक थेंब पाणी नाही़ उरलेल्या दोन महिन्यांत पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावली तरच हे प्रश्न निकाली निघणार आहेत़ अन्यथा तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी