परभणी ; व्हॉटस् अॅपवरून मटका खेळणाऱ्या तिघांवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:25 IST2019-02-07T00:24:58+5:302019-02-07T00:25:15+5:30
व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून मटक्याचे आकडे टाईप करून एकमेकांना पाठवत जुगार खेळणाºया तिघांवर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यांच्याकडून १० हजार ५६० रुपये जप्त केले आहेत़

परभणी ; व्हॉटस् अॅपवरून मटका खेळणाऱ्या तिघांवर छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून मटक्याचे आकडे टाईप करून एकमेकांना पाठवत जुगार खेळणाºया तिघांवर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यांच्याकडून १० हजार ५६० रुपये जप्त केले आहेत़
जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा जुगार खेळला जात होता़ विशेष पथकाने ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९़४५ च्या सुमारास छापा टाकून दीपक कैलास प्रधान (रा़ येलदरी), सुरेश उर्फ राजू सुभाषलाल जैस्वाल (तांदूळवाडी ता़ सेनगाव) आणि सुरेश सत्यनारायण जैस्वाल (रा़ जिंतूर) या तिघांना पकडले़ त्यावेळी हे आरोपी लोकांकडून पैसे घेऊन त्यांना मटक्याच्या चिठ्ठया देत होते़ तसेच मोबाईलवरील व्हॉटस्अॅपच्या सहाय्याने मटक्याचे आकडे एकमेकांना पाठवून कल्याण नावाचा जुगार खेळवित होते़ या कारवाईत मोटारसायकल, मोबाईल व रोख १० हजार ५६० रुपये असा ८३ हजारांचा ऐवज जप्त केला आहे़