परभणी : आडगाव फाटा येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:27 IST2018-12-23T00:26:51+5:302018-12-23T00:27:32+5:30
जिंतूर तालुक्यातील आडगाव फाटा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५ लाख ७३ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

परभणी : आडगाव फाटा येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिंतूर तालुक्यातील आडगाव फाटा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५ लाख ७३ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोेलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांना जिंतूर तालुक्यातील आडगाव फाटा येथे जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यावरुन पथक तयार करुन मोरे यांनी शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास आडगाव फाटा येथील शेषराव कुटे यांच्या आखाड्यावर धाड टाकली. यावेळी पत्यावर पैसे लावून विना परवाना बेकायदेशीररित्या तिर्रट नावाचा जुगार खेळताना २१ जण आढळून आले. त्यांच्याकडून ३९ हजार १६० रुपये, मोबाईल, मोटारसायकल, कार व जुगाराचे साहित्य असा ५ लाख ७३ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात आरोपी वैजनाथ धोंडीबा मगर (दौंडगाव), प्रभाकर विठ्ठलराव दाभाडे (रा.आडगाव), मधुकर भीमराव कदम (बोर्डी), बाबाराव साहेबराव नागरे (भगवा), गणेश साहेबराव कदम (जिंतूर), सचिन फकीरराव इंगोले (लाडाळा), माणिक तुळशीराम मस्के (रेपा), सर्जेराव दत्तराव पालवे (रा.मिर्झापूर), दत्तराव आबासाहेब डोंबे (रा.उंडेगाव), अरुण पांडुरंग मुटकळे (रा.वस्सा), दत्ता मुंजाजी दराडे (रा.चिंचोली), सुदाम तातेराव कुटे (रा.वस्सा), जनार्दन रुस्तुम, विजय विश्वनाथ खिल्लारे (दोघे रा.गडदगव्हाण), विष्णू अप्पाराव कुटे (रा.दौंडगाव), मारोती विलासराव येळणे, तातेराव खंडुजी डाखोरे, गजानन दत्तात्रय लाकाडे (सर्व रा.रामेश्वर), प्रकाश झुजाजी दराडे (रा.लिंबाळा), शेषराव माधवराव कुटे, विजयराव देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, उपनिरीक्षक प्रकाश कापुरे, पोह.सुग्रीव केंद्रे, लक्ष्मण धूतराज, निलेश भूजबळ, छगन सोनवणे, संजय घुगे आदींच्या पथकाने केली.