परभणी : पाथरी येथे दोन गटात हाणामारी; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:34 IST2018-10-27T00:33:53+5:302018-10-27T00:34:15+5:30
शहरातील एका बारवर उधार दारु देण्याच्या कारणावरुन लोखंडी गज, विटांनी जोरदार हाणामारी झाल्याची घटना २५ आॅक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून या घटनेतील एकास अटक करण्यात आली आहे.

परभणी : पाथरी येथे दोन गटात हाणामारी; गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): शहरातील एका बारवर उधार दारु देण्याच्या कारणावरुन लोखंडी गज, विटांनी जोरदार हाणामारी झाल्याची घटना २५ आॅक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून या घटनेतील एकास अटक करण्यात आली आहे.
पाथरी शहरातील सोनपेठ फाट्यावर मिलिंद सावंत यांचा हर्षवर्धन पेट्रोलपंप व बिअरबार आहे. या दोन्ही ठिकाणी २५ आॅक्टोबर रोजी रात्री हाणामारीची घटना घडली. या घटनेत दगडफेक होऊन काही जणांचे डोके फुटले आहे. यामध्ये हर्षवर्धन बारमध्ये घडलेल्या घटनेत उधार दारु मागण्याच्या कारणावरुन हाणामारी झाली. बारचालक गोविंद जैस्वाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन लक्ष्मण कांबळे, सचिन कांबळे, प्रमोद कांबळे आणि नितीन चितलांगे यांना उधार दारु न दिल्यामुळे यांनी बारमध्ये बिअरच्या बाटल्या आणि इतर साहित्याची तोडफोड करीत १५ हजार रुपयांचे नुकसान केले आहे. त्याच बरोबर गल्ल्यातील ३५ हजार रुपये लंपास केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर हर्षवर्धन पेट्रोलपंपावर झालेल्या हाणामारीत लक्ष्मण कचरु कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बारवरील पैसे देण्या-घेण्याचे कारण काढून पेट्रोलपंपचालक मिलिंद सावंत व त्यांचा साथीदार गोविंद जैस्वाल आणि इतर दोन जणांनी लोखंडी गजाने मारहाण केली. खिशातील नगदी ५० हजार रुपये काढून घेतल्याची तक्रार दिल्या प्रकरणी मिलिंद सावंत, जैस्वाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.