शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

परभणी : विमा रकमेसाठी केवळ आश्वासनेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:46 IST

२०१७-१८ या वर्षातील खरीप हंगामातील पिकांचा शेतकऱ्यांनी भरलेला विमा मिळावा, यासाठी शेतकºयांनी व संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २३ दिवस व विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ६ दिवस त्याच बरोबर जिल्हाबंद, मोर्चे व केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन मदत देण्याची मागणी केली; परंतु, अद्यापपर्यंत वंचित शेतकºयांना आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नसल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: २०१७-१८ या वर्षातील खरीप हंगामातील पिकांचा शेतकऱ्यांनी भरलेला विमा मिळावा, यासाठी शेतकºयांनी व संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २३ दिवस व विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ६ दिवस त्याच बरोबर जिल्हाबंद, मोर्चे व केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन मदत देण्याची मागणी केली; परंतु, अद्यापपर्यंत वंचित शेतकºयांना आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नसल्याचे दिसून येत आहे.गतवर्षी जिल्ह्यातील ६ लाख ९७ हजार ७१७ शेतकºयांनी ३१ कोटी ५८ लाख ९८ हजार रुपयांचा पीक विमा रिलायन्स जनरल इन्शुरन्सकडे काढला होता; परंतु, शेतकºयांना पीक विमा मंजूर करताना राज्य शासनाने केंद्र शासनाचे नियम बदलून विमा कंपनीला फायदा पोहचविण्यासाठी महसूल मंडळ व गाव घटक ग्राह्य न धरता तालुका घटक ग्रहित धरला. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकरी पात्र असूनही या पीक विम्याच्या मदतीपासून वंचित राहिले. विशेष म्हणजे या संदर्भातील पीक कापणी प्रयोग, पंचनामे आदीमध्ये महसूल, जिल्हा परिषद, कृषी विभागाच्या अधिकाºयांनी गंभीर चुका केल्या. याचा लाभ रिलायन्स कंपनीला झाला. तर शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी जून महिन्यात तब्बल २३ दिवस जिल्हा कचेरीसमोर आंदोलन केले. मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांना याबाबतचे निवेदनही देण्यात आले. त्यांच्याकडून वंचित शेतकºयांना न्याय दिला जाईल, असे आश्वासनही मिळाले. या आंदोलनादरम्यान विविध राजकीय पक्ष व संघटनांनी जिल्हाबंद, रास्तारोको, जिल्हा कचेरीत ठिय्या आंदोलन केले होते. महिनाभरानंतर या प्रक्रियेत प्रशासकीय पातळीवरुन काय हालचाली झाल्या, याबाबतची माहिती रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने घेतली. त्यानंतर ४१ कोटींची मदत जिल्ह्यातील काही महसूल मंडळातील शेतकºयांना देण्यात आली. आंदोलनापूर्वी १०६ कोटी ११ लाख ७१ हजार रुपयांचा पीक विमा ३ लाख ३१ हजार ७८८ शेतकºयांना मिळाला होता. त्यानंतर आणखी जवळपास २५० कोटी रुपयांचा पीक विमा ३० दिवसांत मिळणे अपेक्षित होते; परंतु, त्यानंतर कंपनीने १८ आॅगस्ट २० कोटी ९६ लाख व त्यानंतर आतापर्यंत २१ कोटी रुपयांचीच रक्कम जिल्ह्यातील शेतकºयांना वर्ग केली. यामध्ये पालम तालुक्यातील बनवस, चाटोरी, पालम, सेलू तालुक्यातील चिकलठाणा, देऊळगाव गात, कुपटा, सेलू, वालूर, सोनपेठ तालुक्यातील आवलगाव, सोनपेठ या महसूल मंडळातील काही शेतकºयांना लाभ मिळाला. उर्वरित महसूल मंडळांतील शेतकºयांना मात्र अद्यापपर्यंत तरी लाभ देण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे जिल्ह्यात आंदोलने करुनही लाभ मिळत नसल्याने शेतकरी संघटनेच्या वतीने २९ आॅक्टोबर पासून सलग सहा दिवस औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तालयासमोर उपोषण सुरु केले. या आंदोलनानंतर मागण्यांचा सकारात्मक विचार करुन न्याय दिला जाईल, असे आश्वासन पुन्हा एकदा मिळाले. परभणी येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय ते केंद्रीय कृषीमंत्र्यांपर्यंत जिल्ह्यातील शेतकरी व लोकप्रतिनिधींनी २०१७-१८ च्या खरीप हंगामामधील पिके संरक्षित केलेल्या शेतकºयांना विम्याची रक्कम देण्यात यावी, यासाठी पाठपुरावा केला; परंतु, एक ते सव्वा वर्षाचा कालावधी उलटला तरी या शेतकºयांना मदत देण्यात आलेली नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाcollectorजिल्हाधिकारी