परभणी:दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास तलवारीने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:04 IST2019-03-25T00:03:32+5:302019-03-25T00:04:07+5:30
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एकास तलवारीने मारहाण केल्याची घटना २१ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील उड्डाणपुलाखाली घडली. या प्रकरणी १२ जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

परभणी:दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास तलवारीने मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एकास तलवारीने मारहाण केल्याची घटना २१ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील उड्डाणपुलाखाली घडली. या प्रकरणी १२ जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात किरणसिंग करमाडसिंग जुन्नी यांनी कोतवाली पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार २१ मार्च रोजी शहरातील उड्डाणपूल परिसरात ही मारहाण करण्यात आली. आरोपी संतोष गुजर, मतीन, रवी गुजर, रामा गुजर, सुनील शिराळे, दीपक गुजर, मोहन गुजर, किरण रामा गुजर, अर्जुन संतोष गुजर, अंबादास रामा गुजर, प्रकाश गुजर, भानुदास रामा गुजर यांनी ही मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून वरील बारा आरोपींविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे यासह इतर कलमान्वये कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मारहाणीत जखमी झालेले किरणसिंग जुन्नी यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू असल्याची माहिती दिली. पोनि सुरेश दळवे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.