परभणी: जुगाऱ्यांकडून एक लाखाचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:44 IST2019-02-28T00:44:16+5:302019-02-28T00:44:34+5:30
शहरातील उड्डाणपुलाच्या बाजुस जुगार खेळणाऱ्या सात जुगाऱ्यांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पकडले असून, त्यांच्याकडून १ लाख १० हजार ५९० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़

परभणी: जुगाऱ्यांकडून एक लाखाचा ऐवज जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील उड्डाणपुलाच्या बाजुस जुगार खेळणाऱ्या सात जुगाऱ्यांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पकडले असून, त्यांच्याकडून १ लाख १० हजार ५९० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़
शहरातील उड्डाण पुलाच्या बाजुस असलेल्या श्याम ट्रान्सपोर्ट लगत पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मधुकर चट्टे, बाळासाहेब तुपसुंदरे, भगवान भुसारे, हरि खुपसे, दिलावर पठाण यांनी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी छापा टाकला़ त्यावेळी सय्यद इसाक स़ सत्तार, दत्ता किशन साळवे, बापू उर्फ गुरु मारोतराव साळवे, मदननाथ गंगनाथ शिंदे, कमीम खान, आकाश पांडूरंग कांबळे, शेख सज्जक शेख रज्जक हे तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना मिळून आले़ पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, मोबाईल, चार मोटारसायकल असा १ लाख १० हजार ५९० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात जुगार बंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला आहे़