परभणी : तहसील परिसरातील आगीत जुने रेकॉर्ड झाले जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:26 AM2018-12-12T00:26:27+5:302018-12-12T00:26:48+5:30

येथील तहसील कार्यालयाच्या आवारात पडीक अवस्थेत असलेल्या तीन खोल्यांमध्ये आग लागल्याची घटना १० डिसेंबर रोजी रात्री घडली. या आगीत २००४ च्या विधानसभा निवडणुकीचे जुने रेकॉर्ड जळून खाक झाले आहे.

Parbhani: Old records in the blaze in Tehsil area have been burnt | परभणी : तहसील परिसरातील आगीत जुने रेकॉर्ड झाले जळून खाक

परभणी : तहसील परिसरातील आगीत जुने रेकॉर्ड झाले जळून खाक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील तहसील कार्यालयाच्या आवारात पडीक अवस्थेत असलेल्या तीन खोल्यांमध्ये आग लागल्याची घटना १० डिसेंबर रोजी रात्री घडली. या आगीत २००४ च्या विधानसभा निवडणुकीचे जुने रेकॉर्ड जळून खाक झाले आहे.
तहसील कार्यालयाच्या परिसरातच जुन्या बांधकामातील तीन खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये भंगार खुर्च्या, टेबल, कपाट आणि २००४ च्या निवडणुकीत वापरलेल्या पेट्या ठेवल्या होत्या. सोमवारी रात्री बारा वाजेनंतर या खोल्यांना आग लागली. दरम्यान, बघता-बघता ही आग वाढत गेली. पोलीस नियंत्रण कक्षातून अग्नीशमन दलाला रात्री २.११ वाजण्याच्या सुमारास आगीची माहिती देण्यात आली. अग्नीशमन दलाचे सचिन राठोड, मदन राठोड, वाहनचालक शेख मौला आदींनी घटनास्थळी दाखल होऊन दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. दरम्यान, जुन्या असलेल्या या तीनही खोल्यांमध्ये वीज प्रवाह नाही. या खोल्या वापरात नाहीत. असे असताना आग नेमकी लागली कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे. या घटनेत या खोल्यांमधील फर्निचर, कागदपत्र जळून खाक झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, या संदर्भात तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, या तीन खोल्यांमध्ये वीजप्रवाह नव्हता. त्यामुळे आग लागण्याचे कारणच नाही. घडलेली घटना दुदैर्वी आहे. या प्रकरणी पंचनामा केला असून, त्यात २००४ च्या निवडणुकीतील वापरात नसलेले जुने कागदपत्र जळाले आहेत. या संदर्भात रितसर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Parbhani: Old records in the blaze in Tehsil area have been burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.