परभणी:रोखपालाविरूद्ध अपहाराचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:26 IST2019-04-16T23:25:57+5:302019-04-16T23:26:29+5:30
करापोटी जमा झालेल्या १३ लाख ३८ हजार ८३ रुपयांच्या रकमेचा अपहार केल्या प्रकरणी नगरपालिकेतील रोखपाल शंकर प्रभाकर काळे यांच्याविरूद्ध १६ एप्रिल रोजी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़

परभणी:रोखपालाविरूद्ध अपहाराचा गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): करापोटी जमा झालेल्या १३ लाख ३८ हजार ८३ रुपयांच्या रकमेचा अपहार केल्या प्रकरणी नगरपालिकेतील रोखपाल शंकर प्रभाकर काळे यांच्याविरूद्ध १६ एप्रिल रोजी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़
रोखपाल शंकर काळे यांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी व इतर वसुली पालिकेच्या बँक खात्यात जमा केली नसल्याचे लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले होते़ त्यावरून निर्धारक बाबर खान अब्दुल हमीद खान यांच्या फिर्यादीवरून शंकर काळे याच्याविरूद्ध अपहाराचा गुन्हा नोंद झाला़सपोनि प्रवीण धुमाळ तपास करीत आहेत़