परभणी : विविध गुन्ह्यांतील नऊ आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:17 IST2018-09-23T00:16:10+5:302018-09-23T00:17:01+5:30
पालम पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडलेल्या वेगवेगळ्या सहा गुन्ह्यांमधील ९ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, या आरोपींकडून सहा मोटारसायकल, ताब्याच्या पट्ट्या व इतर साहित्य असा १ लाख ५६ हजार २६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़

परभणी : विविध गुन्ह्यांतील नऊ आरोपींना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पालम पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडलेल्या वेगवेगळ्या सहा गुन्ह्यांमधील ९ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, या आरोपींकडून सहा मोटारसायकल, ताब्याच्या पट्ट्या व इतर साहित्य असा १ लाख ५६ हजार २६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
पालम शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये चोरीच्या घटनांत वाढ झाली होती़ दुचाकी चोरीसह तांब्याच्या प्लेट चोरीच्या घटनाही घडल्या आहेत़ याप्रकरणी पालम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला होता़ पोलिसांनी सहा प्रकरणांचा तपास लावला असून, त्यात ९ आरोपींना अटक केली आहे़ दुचाकी चोरीच्या प्रकरणामध्ये आरोपी विनायक शिवाजी हाके, बालाजी पांडूरंग सूरनर, सद्दाम शेख बाबू, माधव निवृत्ती हत्तीअंबिरे या चौघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून सहा दुचाकी वाहने जप्त केली आहेत़
तांब्याच्या प्लेट चोरीच्या घटनेत शेख गौस, सालेमिया मोहम्मद चाऊस, शाहरुख समीर पठाण, रईस पठाण समद पठाण, अफरोज पठाण कलंदर पठाण या पाच आरोपींना अटक करण्यात आली़
यातील शेख गौस हा व्यापारी असून, इतर चौघांनी चोरीचा माल त्यास विक्री केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले़
पोलिसांनी या दोन्ही प्रकरणात ९ आरोपींना अटक केली आहे़ ६ मोटारसायकल, तांब्याच्या ४६ पट्ट्या, ३ रॉड असा १ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला़ ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, पालम पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विवेक सोनवणे, सुरेश डोंगरे, संजय शेळके, किशोर चव्हाण, रामकिशन काळे, किशोर भुमकर, गणेश कौटकर, विशाल वाघमारे, राजेश आगाशे, राठोड आदींनी केली़
पूर्णा दंगलीतील आरोपी ताब्यात
परभणी- आॅगस्ट महिन्यात पूर्णा येथे झालेल्या दंगल प्रकरणातील मुख्य आरोपीस पोलिसांनी २२ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले आहे़ पूर्णा शहरात २५ आॅगस्ट रोजी दोन गटांतील वादातून दगडफेकीची घटना घडली होती़ या प्रकरणात पोलिसांनी सोमनाथ नरहरी सोलव (२४, रा़ बरबडी) याच्यासह इतर आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला होता़ घटनेनंतर सोमनाथ सोलव हा फरार होता़ स्थानिक गुन्हा अन्वषेण शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून गंगाखेड नाका येथे सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले़ ही कामगिरी स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुग्रीव केंद्रे, लक्ष्मीकांत धृतराज, भगवान भुसारे, खुपसे, दिलावर पठाण, जमीरोद्दीन फारुखी, निलेश भुजबळ, यशवंत वाघमारे, परमेश्वर शिंदे यांनी केली़