परभणीत मंदिर प्रकरणावरून शिंदेसेना आक्रमक; मनपा कार्यालयाची तोडफोड, बंदोबस्तात वाढ

By राजन मगरुळकर | Updated: March 24, 2026 16:22 IST2026-03-24T16:19:46+5:302026-03-24T16:22:44+5:30

परभणी मनपावर शिंदेसेनेचा हल्लाबोळ: मनपा कार्यालयात पोलीस फौजफाटा तैनात

Parbhani News: Shinde Shiv Sena Workers Vandalize Municipal Office Over Temple Demolition Issue | परभणीत मंदिर प्रकरणावरून शिंदेसेना आक्रमक; मनपा कार्यालयाची तोडफोड, बंदोबस्तात वाढ

परभणीत मंदिर प्रकरणावरून शिंदेसेना आक्रमक; मनपा कार्यालयाची तोडफोड, बंदोबस्तात वाढ

परभणी : शहरातील वांगी रोड आपणा नगर भागात मोकळ्या जागेवरील मारुती मंदिर तोडून मूर्ती उचलून घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. मात्र, यानंतर संतप्त शिवसैनिकांनी मनपाच्या कार्यालयात प्रवेश करीत काही केबिनच्या काचा, साहित्याची तोडफोड केली. यामुळे मनपा परिसरात तणाव निर्माण झाला आहे. 

अपनानगर येथे मोकळ्या जागेवर मागील काही वर्षांपूर्वी मारुती मूर्तीची स्थापना केली होती. या ठिकाणी महापालिकेने २४ मार्चच्या पहाटे अंधारात पोलिस फौजफाटा घेऊन मंदिराचा ओटा तोडून टिनशेड काढून टाकले. हा प्रकार सकाळी समोर आला. सदरील मूर्ती देखील मनपाने घेऊन गेल्यामुळे विटंबना झाल्याचा आरोप सकल हिंदू समाजाने केला. दुपारी दीड वाजेच्या सुमारास मनपा प्रवेशद्वार येथे आंदोलक दाखल झाले होते. हे आंदोलन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्यासह विविध सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. 

कार्यालयाची केली तोडफोड
महापालिकेतील कुठलेही अधिकारी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्यास उपस्थित नसल्याने बराच वेळ थांबल्यानंतर उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांच्याशी संवाद साधण्यात आला. मात्र, कारवाईबाबत ठोस आश्वासन व तोडगा न निघाल्याने आंदोलकांनी ठिय्या मांडून कार्यालयात प्रवेश करीत काही भागाची तोडफोड केली. मनपा परिसरात पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणावर दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हा शाखेसह तीनही पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले होते. याबाबत मनपा कार्यालयात उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांच्यासोबत कारवाईच्या प्रश्नासंदर्भात बैठक सुरू झाली आहे.

Web Title : परभणी में मंदिर विध्वंस पर शिंदे सेना का प्रदर्शन; नगर निगम कार्यालय में तोड़फोड़

Web Summary : परभणी में मंदिर विध्वंस के खिलाफ शिंदे सेना का प्रदर्शन, कथित तौर पर अधिकारियों द्वारा हनुमान मूर्ति हटाने के बाद नगर निगम कार्यालय में तोड़फोड़ की गई। प्रदर्शनकारियों ने शामिल अधिकारियों के खिलाफ कार्रवाई की मांग की, जिसके कारण तनाव बढ़ गया। तोड़फोड़ के बाद भारी पुलिस बल तैनात।

Web Title : Shinde Sena Protests Parbhani Temple Demolition; Vandalizes Municipal Office

Web Summary : Shinde Sena protested Parbhani temple demolition, vandalizing the municipal office after officials allegedly removed a Maruti idol. Tensions rose as protestors demanded action against involved officers. The vandalism prompted a heavy police presence and ongoing meetings.