परभणी:११ हजार मतदारांची नावे यादीत दोनदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:38 PM2019-03-11T23:38:07+5:302019-03-11T23:38:51+5:30

मतदार यादीमध्ये दुबार नावे आल्यासंदर्भात एका राजकीय पक्षाने केलेल्या तक्रारीतील ४५ हजार ९३ नावांपैकी ४२ हजार ८३८ नावांची पडताळणी करण्यात आली असून त्यामध्ये १० हजार ८४९ मतदारांच्या मतदान कार्डावरील छायाचित्र एक सारखेच असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

Parbhani: The names of 11 thousand voters twice in the list | परभणी:११ हजार मतदारांची नावे यादीत दोनदा

परभणी:११ हजार मतदारांची नावे यादीत दोनदा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मतदार यादीमध्ये दुबार नावे आल्यासंदर्भात एका राजकीय पक्षाने केलेल्या तक्रारीतील ४५ हजार ९३ नावांपैकी ४२ हजार ८३८ नावांची पडताळणी करण्यात आली असून त्यामध्ये १० हजार ८४९ मतदारांच्या मतदान कार्डावरील छायाचित्र एक सारखेच असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर या संदर्भातील माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सोमवारी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील मतदार यादीतील ४५ हजार ९३ मतदारांची नावे दुबार आल्याची तक्रार एका राजकीय पक्षाकडून करण्यात आली होती. या तक्रारीतील २ हजार २५५ मतदारांची पडताळणी करणे बाकी असून ४२ हजार ८३८ नावांची आतापर्यंत पडताळणी करण्यात आली आहे. त्यापैकी १० हजार ८४९ मतदारांच्या मतदान ओळखपत्रावरील छायाचित्र एकसारखे आढळून आले आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यांतर कोणतेही नाव यादीतून वगळता येत नाही. यामुळे या दुबार नावांची बीएलओस्तरावर घरोघरी जावून तपासणी करण्यात येणार आहे व त्याच व्यक्ती आहेत का? याची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करुन ठेवण्यात येणार आहे. पुढील कारवाई निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार केली जाणार आहे. दरम्यान, तक्रार केलेल्या यादीमधील ३१ हजार ९८९ मतदारांचे चेहरे जुळत नाहीत. त्यांचेही फिल्ड व्हेरिफिकेशन होणार आहे. तत्पूर्वीच दुबार नावे आलेल्या ७६३ मतदारांची नावे पूर्वीच यादीतून डिलीट केली आहेत. तक्रार करण्यात आलेल्या यादीतील मतदारांची सखोल तपासणी करण्यात येणार असून तक्रारकर्त्या पक्षाला येत्या ३ ते ४ दिवसांत याबाबतची माहिती दिली जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दुसऱ्या टप्यात म्हणजेच १८ एप्रिल रोजी होणार असल्याने नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच २६ मार्चपर्यंत नवमतदारांना नाव नोंदणी करता येणार आहे. मतदार यादीतील पडताळणी संदर्भात १९५० हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयात २२६४०० हा कंट्रोल रुम नंबरही तक्रारींसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर निवडणूक विभाग तातडीने कारवाई करणार असून यासाठी सी व्हीजिल नावाचे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपद्वारे तक्रारी करण्यात येणार आहेत. राजकीय पक्षांच्या खर्च नोंदणीस आचारसंहिता लागू झाल्यापासून सुरुवात झाली आहे. उमेदवारांना दैनंदिन खर्चाची नोंद नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यापासून द्यावी लागणार असून प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रुपयापर्यंत खर्च करता येणार आहे. यासाठी त्यांना स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार आहे. जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून बँकेतून १ लाख रुपयाच्यावर रक्कम काढली जात असेल तर त्याची माहिती निवडणूक विभागाला देण्यास सांगण्यात आले आहे. सर्व मतदान केंद्रांवर अपंगांसाठी स्वतंत्र रॅम्प तयार करण्यात येणार आहे. मागणीनुसार त्यांना वाहने दिली जातील, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवडणूक उपजिल्हाधिकारी महादेव किरवले आदींची उपस्थिती होती.
२२ भरारी पथकांची स्थापना
४आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मतदारसंघात २२ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून १५ व्हिडिओ सहनिरीक्षण पथक नियुक्त करण्यात आले आहेत. १८ स्थिर नियंत्रण पथकांची नियुक्ती करण्यात आली असून व्हिडिओ चित्रीकरण तपासण्यासाठी चार पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ११ आचारसंहिता पथके स्थापन्यात आली आहेत. खर्चाची पडताळणी करण्यासाठी ४ पथकांची स्थापना करण्यात आली असून यासाठी ४ खर्च सहाय्यक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
२०१४ मध्ये आचारसंहिता भंगाचे ४८ गुन्हे
४२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी ४८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ३ गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली असून २६ प्रकरणांमध्ये संंबंधित आरोपींना निर्दोष सोडण्यात आले आहे. १२ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. ३ प्रकरणात ए. बी. फायनल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
५४ संवेदनशील मतदान केंदे्र
४परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार १६४ मतदारकेंद्र असून त्यातील ५४ मतदार केंद्रे संवेदनशील आहेत. या मतदान केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अनुषंगाने हद्दपारीचे प्रस्ताव निकाली काढण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.

Web Title: Parbhani: The names of 11 thousand voters twice in the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.