परभणीत प्रेमसंबंधाच्या नकारानंतर प्रेयसीचा धारदार शस्त्राने केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 05:29 IST2020-02-11T05:29:29+5:302020-02-11T05:29:42+5:30

आरोपीला अटक; पोलिसांकडे दिली खुनाची कबुली

Parbhani murder of a lover with a sharp weapon after denial of a love affair | परभणीत प्रेमसंबंधाच्या नकारानंतर प्रेयसीचा धारदार शस्त्राने केला खून

परभणीत प्रेमसंबंधाच्या नकारानंतर प्रेयसीचा धारदार शस्त्राने केला खून

परभणी : आपली प्रेयसी यापुढे प्रेमसंबंध ठेवणार नाही, याची खात्री पटल्यानंतर आरोपी संजय उर्फ पप्पू रमेश जोंधळे (२५ रा. तट्टूजवळा,ता. परभणी) याने उसाच्या शेतात नेऊन नारळ तोडण्याच्या हत्याराने वार करीत तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला आहे.


रामपुरी शिवारातील यादव यांच्या शेतात ८ फेब्रुवारी रोजी एका अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. य्या ठिकाणी असलेल्या साडी व चप्पलवरुन ऊसतोड कामगारांच्या टोळीतील हरवलेली महिला असल्याचे निष्पन्न झाले.
महिलेच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या महिलेचे प्रेमसंबंध असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्या आधारे पोलिसांनी काही संशयितांनाही ताब्यात घेतले होते. या संशयितांपैकी संजय उर्फ पप्पू रमेश जोंधळे यास पूर्णा तालुक्यातून १० फेब्रुवारी रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याने प्रेमसंबंधातून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.


सांगलीत विधवेस कालव्यात फेकले
कोकरुड (जि. सांगली) : विधवेवर बलात्कार करून, तिला कालव्यात फेकून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शिराळा तालुक्यात रविवारी घडला. पीडित महिलेवर सांगलीच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयित अरुण सुनील जमदाडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर तो फरार झाला आहे. पीडितेला पोहता येत असल्याने ती बचावली.

Web Title: Parbhani murder of a lover with a sharp weapon after denial of a love affair

टॅग्स :Murderखून