परभणी : बेपत्ता मुलाचा आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:02 IST2019-04-25T00:02:01+5:302019-04-25T00:02:56+5:30
पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या २४ वर्षीय मतीमंद मुलाचा मृतदेह २४ एप्रिल रोजी शहरातील महावीर नगर परिसरातील विहिरीत आढळला़

परभणी : बेपत्ता मुलाचा आढळला मृतदेह
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या २४ वर्षीय मतीमंद मुलाचा मृतदेह २४ एप्रिल रोजी शहरातील महावीर नगर परिसरातील विहिरीत आढळला़
महावीर नगर परिसरातील नरसिंग बावडी या विहिरीत मृतदेह तरंग असल्याचे बुधवारी सकाळी येथील नागरिकांनी पाहिले़ या संदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर जमादार अर्जुन रणखांब व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली़ स्थानिकांच्या मदतीने हा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला़ चौकशी अंती हा मृतदेह महादेव मंदिर परिसरात राहणाºया श्रीपाद बाळकृष्ण कुलकर्णी याचा असल्याचे निष्पन्न झाले़ हा युवक २० एप्रिलपासून घरातून बेपत्ता होता़ कुटूंबियांनी २२ एप्रिल रोजी पूर्णा पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती़ मयताचे वडील बाळकृष्ण कुलकर्णी यांच्या माहितीवरून पूर्णा पोलीस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ जमदार अर्जुन रणखांब तपास करीत आहेत़