परभणी : वीज उपकेंद्रास ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:24 IST2019-01-30T00:23:40+5:302019-01-30T00:24:24+5:30
येथील ३३ केव्ही उपकेंद्राचा कारभार ढेपाळल्याने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी २९ जानेवारी रोजी उपकेंद्रास कुलूप ठोकून रोष व्यक्त केला.

परभणी : वीज उपकेंद्रास ठोकले कुलूप
लोकमत न्यूज नेटवर्क
देवगावफाटा (परभणी): येथील ३३ केव्ही उपकेंद्राचा कारभार ढेपाळल्याने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी २९ जानेवारी रोजी उपकेंद्रास कुलूप ठोकून रोष व्यक्त केला.
वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीज पुरवठा होणे अशा अडचणींमुळे परिसरातील वीज ग्राहक वैतागले होते. वीज उपकेंद्रातून ग्राहकांना सुरळीत सेवा दिली जात नव्हती. त्यातच २९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरु न झाल्याने पवन मोरे, बाळू मोरे, बाळू ढोणे, ज्ञानेश्वर सोन्ने, राजू काकडे, प्रकाश मोरे आदींसह ग्रामस्थ उपकेंद्रावर तक्रार नोंदविण्यासाठी गेले; परंतु, तेथे कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांनी वीज उपकेंद्राला कुलूप ठोकले. काही वेळाने एक कर्मचारी उपकेंद्रात दाखल झाला. मात्र वरिष्ठांनी तक्रार ऐकल्याशिवाय कुलूप न उघडण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. याचवेळी आ.विजय भांबळे हे सेलू येथे जात असताना उपकेंद्राच्या ठिकाणी थांबले. ग्रामस्थांच्या अडचणी वरिष्ठांना कळवून त्या सोडविण्याचे आश्वासन आ.भांबळे यांनी दिल्यानंतर उपकेंद्राचे कुलूप उघडण्यात आले.