Parbhani: The locked lock at Badavani school | परभणी : बडवणीच्या शाळेस ठोकले कुलूप
परभणी : बडवणीच्या शाळेस ठोकले कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : श्री भगवान बाबा विद्यालयातील दोन शिक्षकांचीबदली केल्याने संतप्त ग्रामस्थांनी १९ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शाळेला कुलूप ठोकले.
युवक विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री भगवान बाबा विद्यालय तालुक्यातील बडवणी येथे चालविले जाते. या शाळेतील रुद्रे व तांदळे या दोन शिक्षकांची इतर ठिकाणी बदली करण्यात आली. यापूर्वी देखील मराठी विषयाच्या शिक्षकाची बदली करण्यात आली होती. शिक्षकांच्या बदल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी शाळेतील मुख्याध्यापकांच्या कक्षाला व वर्गखोल्यांना कुलूप ठोकले. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दोन्ही शिक्षकांच्या बदल्या रद्द कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी सरपंच शंभूदेव मुंडे, ग्रा.पं. सदस्य अशोक मुंडे यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


Web Title: Parbhani: The locked lock at Badavani school
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.