शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

परभणी : तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात भुरभूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:03 IST

शुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला आहे़ रविवारी जिल्ह्यात मोठा पाऊस झाला नसला तरी दुपारी १२ वाजेपर्यंत अनेक भागामध्ये रिमझिम पाऊस झाला आहे़ या पावसाने खरिप पिकांना दिलासा मिळाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला आहे़ रविवारी जिल्ह्यात मोठा पाऊस झाला नसला तरी दुपारी १२ वाजेपर्यंत अनेक भागामध्ये रिमझिम पाऊस झाला आहे़ या पावसाने खरिप पिकांना दिलासा मिळाला आहे़दीड महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर परभणी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली़ जिल्हाभरात सर्वदूर भीज पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले आहेत़ शुक्रवारी आणि शनिवारी असे दोन दिवस रिमझिम पावसामुळे प्रथमच पावसाळी वातावरण जिल्हावासियांना अनुभवायास मिळाले़ या पावसामुळे कापूस, सोयाबीन या पिकांना दिलासा मिळाला आहे़ दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने ही पिके माना टाकत होती़ऐनवेळी पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे़ रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १२़९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ पाथरी तालुक्यात सर्वाधिक २५ मिमी, मानवत तालुक्यात २३़३३ मिमी, परभणी १४़५०, सेलू १४़८०, पूर्णा १३, पालम ८, सोनपेठ ६़५०, गंगाखेड ५़७५ आणि जिंतूर तालुक्यात ५़६७ मिमी पाऊस झाला आहे़१ जूनपासून आतापर्यंत अपेक्षित पावसाच्या प्रमाणात केवळ ५५ टक्के पाऊस झाला आहे़ मानवत तालुक्यात सर्वाधिक ६९़२ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ २२ टक्के पाऊस झाला आहे़ मानवत तालुक्यात सर्वाधिक २७़७ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.पिके तगली; पाण्याचा प्रश्न कायम४जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना काही दिवसांपुरता दिलासा मिळाला आहे़ या पावसाने खरीप पिकांच्या उत्पादनात थोडीफार भर पडेलही़ परंतु, जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही़४धरणामध्ये पाणीसाठा होईल, असा पाऊस झाला नाही़ परभणी जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ आजपर्यंत झालेल्या पावसामुळे या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली नसल्याने पाण्याचा प्रश्न कायम आहे़ जिल्हावासियांना आगामी उन्हाळ्यातील पाण्याची चिंता लागलेली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी