परभणी: पिकअप-दुचाकी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:06 IST2019-04-15T00:05:42+5:302019-04-15T00:06:45+5:30
पीकअप आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना देवगावफाटा येथून जवळ असलेल्या कर्नावळ पाटीवर रविवारी सायंकाळी ४ वाजता घडली़

परभणी: पिकअप-दुचाकी अपघातात एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
देवगावफाटा (परभणी) : पीकअप आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना देवगावफाटा येथून जवळ असलेल्या कर्नावळ पाटीवर रविवारी सायंकाळी ४ वाजता घडली़
सेलू तालुक्यातील जवळा जिवाजी येथील गजानन राजाराम भुजबळ (२७), सावंत वैजनाथ भांडवले (२४) व योगेश माऊली भुजबळ (२२) हे तिघे दुचाकीने (एमएच २२ एजे- ०७२०) मंठ्याहून देवगावफाट्याकडे येत असताना कर्नावळ पाटीजवळ समोरून येणाऱ्या पीकअप आणि दुचाकीची धडक झाली़ त्यात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले़ घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी धाव घेतली़
जखमींना मंठा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले़ योगेश भुजबळ याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले; परंतु, उपचारा दरम्यान योगेशची प्राणज्योत मालवली़ या अपघातातील इतर दोन जखमींवर मंठा येथेच उपचार सुरू आहेत़ या प्रकरणी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती़