परभणी : ज्वारीच्या विम्याचे दीड कोटी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:54 IST2019-07-31T23:54:31+5:302019-07-31T23:54:54+5:30
विमा कंपनीने तांत्रिक कारण सांगून परभणी तालुक्यातील ५६ गावांतील ३ हजार ७०० शेतकऱ्यांना नाकारलेला विमा शिवसेनेच्या मुंबईतील मोर्चामुळे पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्याबाबतचे लेखी आश्वासन भारती एक्सा कंपनीने दिले असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली.

परभणी : ज्वारीच्या विम्याचे दीड कोटी मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विमा कंपनीने तांत्रिक कारण सांगून परभणी तालुक्यातील ५६ गावांतील ३ हजार ७०० शेतकऱ्यांना नाकारलेला विमा शिवसेनेच्या मुंबईतील मोर्चामुळे पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्याबाबतचे लेखी आश्वासन भारती एक्सा कंपनीने दिले असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली.
२०१८ मधील रबी हंगामातील ज्वारीचा पीक विमा परभणी तालुक्यातील ५६ गावातील १७ हजार शेतकऱ्यांनी काढला होता. त्यापैकी १४ हजार शेतकºयांना भारती एक्सा या कंपनीने पीक विम्याची नुकसान भरपाई दिली. तांत्रिक कारणे सांगून ३ हजार ७०० शेतकºयांना या पीक विम्याच्या नुकसान भरपाई पासून वंचित ठेवले. १७ जुलै रोजी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील भारती एक्सा कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आ.डॉ.राहुल पाटील परभणी तालुक्यातील रब्बी हंगामातील पीक विम्याचा प्रश्न निदर्शनास आणून दिला. त्यानंतर भारती एक्सा कंपनीने झालेली चूक मान्य करत उर्वरित ३ हजार ७०० पैकी २ हजार ६२४ शेतकºयांना पीक विम्याच्या भरपाईपोटी १ कोटी ४७ लाख ४८ हजार ३०० रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा करत असल्याचे पत्र आ.डॉ.राहुल पाटील यांना पाठविले आहे. त्यामुळे परभणी जिल्हा सरपंच संघटनेच्या पदाधिकाºयांनी २७ जुलै रोजी आ.डॉ.राहुल पाटील यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चोपडे, गोपीनाथ तुडमे, सोपान आरमळ, दामोदर सानप, उत्तम मुळे, रमेश चोपडे, शिवाजी गरुड आदींची उपस्थिती होती.
आ.राहुल पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकºयांच्या रबीच्या ज्वारीचे दीड कोटी मिळणार असल्याचे समाधान व्यक्त होत आहे.