परभणी : कॉंग्रेसच्या बैठकीत इच्छुकांच्या मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:47 IST2019-01-14T00:47:40+5:302019-01-14T00:47:59+5:30
येथील जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात रविवारी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

परभणी : कॉंग्रेसच्या बैठकीत इच्छुकांच्या मुलाखती
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात रविवारी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बी.आर. कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीत परभणीची जागा कॉंग्रेसला सुटली तर किती उमेदवार इच्छुक आहेत, याची चाचपणी यावेळी करण्यात आली. त्यावेळी माजी खा.तुकाराम रेंगे, हरिभाऊ शेळके, अॅड.मुजाहीद आणि माजी आ.सुरेश देशमुख यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. सुरेश देशमुख हे बाहेरगावी असल्याने त्यांची मुलाखत झाली नाही; परंतु, इतर तिघांची मुलाखत घेऊन त्यांच्या नावाचा प्रस्ताव प्रदेश कमिटीकडे पाठविला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या बैठकीस कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, तालुकाध्यक्ष पंजाबराव देशमुख आदींची उपस्थिती होती.