लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : टंचाई परिस्थितीमध्ये टँकर आणि विहीर अधिग्रहणासाठी जिल्हा प्रशासनाकडे दाखल झालेल्या प्रस्तावांची संख्या वाढली असून, प्रलंबित प्रस्तावांची संख्याही ३५ वर पोहचल्याने टंचाई उपाययोजनांची कामे संथगतीने होत असल्याचे दिसत आहे़यावर्षी जिल्ह्यामध्ये आॅक्टोबर महिन्यापासून पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे़ अनेक गावांमधील भूजल पातळी खालावल्याने टंचाईची परिस्थिती निर्माण होत आहे़ जिल्हा प्रशासनाने या काळात करावयाच्या उपाययोजनांसाठी कृती आराखडाही तयार केला आहे़ या आराखड्यानुसार आतापर्यंत जिल्हा प्रशासनाकडे टँकर आणि विहीर अधिग्रहणाचे ५३ प्रस्ताव दाखल झाले आहेत़ पंचायत समितीमार्फत हे प्रस्ताव प्रशासनाला प्राप्त झाले आहे़त्यामध्ये पालम तालुक्यात ४, गंगाखेड १९, पूर्णा १, सेलू ९, सोनपेठ ७, मानवत ३, पाथरी ४ आणि परभणी तालुक्यातील ६ प्रस्ताव दाखल झाले आहेत़ दाखल झालेल्या ५३ पैकी ३६ प्रस्ताव प्रलंबित आहेत़ तहसीलदारांनी आतापर्यंत १७ प्रस्तावांना मंजुरी दिली असून, त्यात पालम तालुक्यातील ४, गंगाखेड, पूर्णा, सेलू प्रत्येकी १, सोनपेठ, परभणी प्रत्येकी ४ आणि मानवत तालुक्यातील २ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.बीडीओकडेच प्रलंबित प्रस्तावपंचायत समितीकडे ५३ प्रस्ताव दाखल झाले असले तरी त्यातील सर्वाधिक ३५ प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांच्या स्तरावर प्रलंबित आहेत़ गंगाखेड तालुक्यातून सर्वाधिक १९ प्रस्ताव दाखल झाले आहेत़ त्यापैकी १८ प्रलंबित असून, १७ गटविकास अधिकाºयांच्या स्तरावर प्रलंबित आहेत़ तसेच सेलू तालुक्यातील ८, सोनपेठ ३, मानवत १, परभणी २ आणि पाथरी तालुक्यातील ४ प्रस्ताव गटविकास अधिकाºयांकडे प्रलंबित आहेत़ विशेष म्हणजे प्रशासनाकडे टँकरसाठी दाखल झालेले दोन्ही प्रलंबित आहेत़
परभणी : प्रलंबित प्रस्तावांची वाढली संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:53 IST