परभणी : संचालकांची सचिवास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:37 IST2018-07-15T00:35:46+5:302018-07-15T00:37:06+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी सचिवास शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना १४ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास बाजार समिती कार्यालयात घडली. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

परभणी : संचालकांची सचिवास मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी सचिवास शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना १४ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास बाजार समिती कार्यालयात घडली. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.
बाजार समितीचे सचिव शिवनारायण सारडा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कर्करोगाच्या उपचारासाठी मदत द्यावी, असे अर्ज खरबा व रुढी येथील केशव खंडेराव निर्मळ व लक्ष्मीबाई पतंगे या दोघांनी दिले होते. त्यावरुन मदतीचे धनादेशही तयार करुन ठेवले. मात्र सभापतींची स्वाक्षरी झाली नव्हती.
शनिवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास संचालक मदनराव लाडाणे कार्यालयात आले. धनादेश का देत नाहीस, असे विचारत शिवीगाळ करुन मारहाण केली व सरकारी कामात अडथळा निर्माण केला. सारडा यांच्या तक्रारीवरुन मदनराव लाडाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर मन्नाळे तपास करीत आहेत.