शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

परभणी: सार्वजनिक ठिकाणांवर रोडरोमिओंचा वाढता त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:13 IST

एक महिन्यापासून शहरातील शाळा, महाविद्यालय सुरु झाली आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालय परिसर व ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे बसस्थानक परिसर गजबजलेला दिसून येत आहे. हीच संधी साधून काही रोडरोमिओ शाळा, महाविद्यालय, बसस्थानक परिसरात जाऊन टोळ्या जमवून टवाळक्या करताना दिसून येत आहेत. यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): एक महिन्यापासून शहरातील शाळा, महाविद्यालय सुरु झाली आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालय परिसर व ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे बसस्थानक परिसर गजबजलेला दिसून येत आहे. हीच संधी साधून काही रोडरोमिओ शाळा, महाविद्यालय, बसस्थानक परिसरात जाऊन टोळ्या जमवून टवाळक्या करताना दिसून येत आहेत. यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.शाळा, महाविद्यालये सुरु झाल्यानंतर ग्रामीण भागासह पाथरी तालुक्यातील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी मानवत शहरात येतात. यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. शाळा, महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थिनी बसची वाट बघत बसस्थानक परिसरात थांबतात. हिच संधी साधत मुली ज्या ठिकाणी थांबलेल्या असतात, त्या ठिकाणी रोडरोमिओ चकरा मारणे, मोटारसायकलवरुन विनाकारण हॉर्न वाजवीत जाणे, मुलींना पाहून शेरेबाजी करणे, असे प्रकार सरार्सपणे करतात. यातील काहीजण शहरातून धुम स्टाईलने दुचाकी पळवून दुचाकीचे कर्कश हॉर्न वाजवित विविध अवाज काढतात. यामुळे अनेक छोटेमोठे आपघात घडल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकारामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही घटना अशाही आहेत की ज्यामध्ये पालकांकडून आपले शिक्षण थांबविले जाईल किंवा त्याचे मोठ्या भांडणामध्ये रुपांतर होईल, या भीतीने अनेक विद्यार्थिनी आपल्या सोबत घडत असलेले प्रकार पालकांना सांगत नाहीत.यामुळे शाळा, महाविद्यालय, खाजगी शिकवणीवाले यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन आपल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्यकता आहे. जेणेकरुन रोडरोमियोंवर कारवाई करणे सोपे जाईल. दुसरीकडे पोलीस प्रशानानेही चिडीमार पथक स्थापन करुन रोडरोमिओंना चाप बसविण्याची मागणी पालकांतून होत आहे. दरम्यान, काही भागात मोटारसायकलवरवरुन विनाकारण हॉर्न वाजवून विद्यार्थिनींना त्रास देण्याचेही प्रकार घडत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची व या रोडरोमिओवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.रोडरोमिओंबाबत अनेक तक्रारीही प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन व दामिनी पथकाने लक्ष देऊन वेळीच कारवाई करण्याची गरज आहे.वळण रस्त्यावर अल्पवयीन मुले सुसाट४शहरातील वळण रस्त्यावर दोन महाविद्यालय, एक शाळा आणि खाजगी कोचिंग क्लासेस आहेत. महाराणा प्रताप चौक ते मल्लिकार्जुन मंदिरापर्यंत असलेल्या पुलाशेजारील रस्त्यावर विद्यार्थ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. मुली याच रस्त्याने शाळा, महाविद्यालयात येत असतात.४या रस्त्यावरुन अल्पवयीन मुले मोटारसायकल सुसाट पळवितानाचे चित्र आहे. पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेउन पालकांशी संपर्क करुन समज देणे गरजेचे झाले आहे. टवाळखोर मुलांबाबत समोर येउन तक्रार करायला मुली घाबरतात. त्यामुळे शाळा, महाविद्यालय परिसरात तक्रारपेट्या बसविण्याची मागणी होत आहे.या भागात सीसीटीव्ही कॅमेºयाची गरज४मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने नगरपालिकेने पुढाकार घेऊन शहरातील मुलींची वर्दळ असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. यामध्ये शहरातील बसस्थानक, महाराणा प्रताप चौक, आठवडे बाजार रस्ता, गोलाईत नगर रस्ता, पोलीस क्वार्टर रस्ता, पाळोदी रस्ता, केंद्रीय प्राथमिक शाळा या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असणे गरजेचे आहे.४तसेच वळण रस्त्यावर असलेल्या शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास शाळा, महाविद्यालयाच्या बाहेरील टवाळखोरांवर लक्ष ठेवणे सोपे जाईल. खाजगी कोचिंग क्लासेस चालकांनीही आपल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाcollegeमहाविद्यालय