परभणी: नमुना क्रमांक ८ चे कागदपत्र काढून देण्यासाठी १,५०० रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी वरुड नृसिंह येथील ग्रामसेवक संतोष दशरथ पांडे यास जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (दि. २) दोन वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. १० वर्षांपूर्वीच्या या प्रकरणाचा निकाल लागल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
काय होते प्रकरण?तक्रारदार अर्जुन भाऊराव चव्हाण यांनी २१ जानेवारी २०१४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), परभणी येथे तक्रार नोंदवली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी या तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपीने लाचेची मागणी केल्याचे ध्वनिमुद्रणाद्वारे सिद्ध झाले. त्यानंतर सापळा रचून आरोपीला रंगेहात पकडण्यात आले होते. याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाचा निकालजिल्हा व सत्र न्यायाधीश एन.आर. नाईकवाडे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. सरकारी पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने संतोष पांडे यास कलम ७ आणि १३(१)(ड) अन्वये प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजुरी आणि एकूण १०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिने सक्तमजुरी भोगावी लागणार आहे. या कारवाईमुळे भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Web Summary : A Gram Sevak in Parbhani received two years imprisonment for accepting a ₹1,500 bribe to issue documents. The court also imposed a ₹10,000 fine; failure to pay results in extra jail time. The verdict, delivered after a decade, has caused a stir within the revenue department and sent a strong message against corruption.
Web Summary : परभणी में एक ग्राम सेवक को दस्तावेज़ जारी करने के लिए ₹1,500 की रिश्वत लेने पर दो साल की कैद हुई। अदालत ने ₹10,000 का जुर्माना भी लगाया; भुगतान न करने पर अतिरिक्त जेल। एक दशक बाद आए फैसले से राजस्व विभाग में खलबली मच गई है और भ्रष्टाचार के खिलाफ कड़ा संदेश गया है।