परभणी : शेती उपयोगी साहित्य खरेदीसाठी निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:51 IST2019-04-08T23:51:35+5:302019-04-08T23:51:56+5:30
येथील तालुका कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना विविध योजनेंतर्गत ३३ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेती उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी हा निधी उपलब्ध झाला आहे.

परभणी : शेती उपयोगी साहित्य खरेदीसाठी निधी
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी) : येथील तालुका कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना विविध योजनेंतर्गत ३३ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेती उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी हा निधी उपलब्ध झाला आहे.
पालम शहरातील तालुका कृषी कार्यालयाने राष्टÑीय अन्नसुरक्षा अभियान, शेती यांत्रिकीकरण अभियान, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेतकऱ्यांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविले होते. प्राप्त झालेल्या अजार्तून घटक निहाय सोडत पद्धतीने शेतकºयांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली होती.
शासनाने दिलेले उद्दिष्ट व शेतकºयांची निवड करून वेळेवर अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली होती. मार्चएंडच्या अगोदर काम केलेल्या शेतकºयांना अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. यांत्रिकीकरणांतर्गत पलटी नांगर, रोटावेटर, तिरी, पंजी या साहित्यासाठी १५ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. कांदा चाळ बांधलेल्या २१ शेतकºयांना १८ लाख ६ हजार रुपयांची देयके अदा करण्यात आली आहेत.
पालम येथील कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग असूनही शेतकºयांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रस्ताव दाखल झालेल्या शेतकºयांनाही ४ दिवसांत अनुदान देण्यात येईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी चव्हाण, कृषी अधिकारी गोविंद काळे, पर्यवेक्षक प्रवीण काळे यांनी दिली.