परभणी :२७० रुग्णांवर मुंबईत मोफत शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:36 IST2018-01-10T00:36:24+5:302018-01-10T00:36:35+5:30
पाथरी विधानसभा मतदारसंघातील २७० रुग्णांवर मुंबई येथे मोफत मोतीबिंदू आणि इतर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आ. मोहन फड यांनी दिली.

परभणी :२७० रुग्णांवर मुंबईत मोफत शस्त्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी: पाथरी विधानसभा मतदारसंघातील २७० रुग्णांवर मुंबई येथे मोफत मोतीबिंदू आणि इतर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आ. मोहन फड यांनी दिली.
पाथरी विधानसभा मतदारसंघातील विविध रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर मोफत उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्याचा उपक्रम आ. मोहन फड यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू केला आहे. त्यानुषंगाने तालुक्यातील २७० रुग्णांची नुकतीच तपासणी करुन शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली होती.
पाथरी, सोनपेठ व परभणी तालुक्यातील २७० रुग्णांवर मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या रुग्णांना ७ जानेवारी रोजी पाथरी येथून मुंबईकडे रवाना करण्यात आले. यासाठी ५ एसटी बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. यावेळी आ. मोहन फड, पं. स. सदस्य दत्तात्रय जाधव, सोनपेठ भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अजित देशमुख, डॉ. राजेंद्र चौधरी, मोईज अन्सारी, विष्णू होंडे, दत्ता आळसे, राजेभाऊ जाधव, हनुमान पितळे, विलास जंगले, राजू दराडे, मदन जाधव, केशव गोंगे आदींची उपस्थिती होती. या रुग्णांची मुंबई येथे मोफत राहण्याची व जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.