शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

परभणी : गणपतीच्या मूर्तीसमोर चौदाशे रोपांची आरास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:32 AM

वृक्षारोपणाचे महत्त्व पटून वृक्षारोपण ही चळवळ व्हावी, या उद्देशाने जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील युवकांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या जनजागरणासाठी गणेशमूर्तीसमोर तब्बल १४०० रोपांची आरास केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वृक्षारोपणाचे महत्त्व पटून वृक्षारोपण ही चळवळ व्हावी, या उद्देशाने जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील युवकांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या जनजागरणासाठी गणेशमूर्तीसमोर तब्बल १४०० रोपांची आरास केली आहे.परभणी जिल्ह्यासह राज्यात मागील काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. दिवसेंदिवस पाऊस कमी होत चालला असून, पर्यावरणाचा असमतोल वाढत आहे. वृक्षारोपणाचे महत्त्व जनसामान्यांना पटवून देण्यासाठी जिंतूर तालुक्यात वेगवेगळ्या मार्गाने नेहमीच प्रयत्न होतात. तालुक्यातील भोगाव येथे ७० एकर परिसरात वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे.गणेशोत्सवाच्या माध्यमातूनही वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देण्याचा निर्णय पुंगळा येथील गणेश भक्तांनी घेतला. त्यातूनच सुमारे चौदाशे रोपांची आरास गणेश मूर्तीसमोर केली आहे. वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखावा, असा संदेश या अभिनव नैसर्गिक देखाव्यातून दिला जात आहे.या कामी गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश जगताप, ज्ञानेश्वर जगताप, राजेश जगताप, शिवाजी जगताप, विजय जगताप, किरण जगताप, सचिन जगताप, अर्जुन जगताप, विठ्ठल जगताप, राहुल जगताप, एकनाथ जगताप, सचिन कदम, प्रताप कदम, रामचंद्र जगताप, कैलास मोरे आदींनी पुढाकार घेतला आहे.खर्चाला फाटा देत राबविला उपक्रमगणेशोत्सव काळात देखाव्याच्या माध्यमातून होणाऱ्या खर्चाला फाटा देत पुंगळा येथील युवकांनी रोपांची आरास करीत पर्यावरणाचा महत्वपुर्ण संदेश जनतेला दिला आहे. विशेष म्हणजे, पिंपळ, वड, चिंच, जांभूळ, सीताफळ, शेवगा, करंजी लिंब ही सावली देणारी आणि पक्ष्यांसाठी उपयुक्त असलेली रोपे याठिकाणी ठेवली आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळRainपाऊस