परभणीत दगडफेक करून चार बस फोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 19:09 IST2018-07-20T17:16:19+5:302018-07-20T19:09:21+5:30
शहरातील विसावा कॉर्नर, एमआयडीसी कॉर्नर, एस.टी. वर्कशॉप व शिवाजी महाविद्यालयासमोर अज्ञात व्यक्तींनी एस.टी. महामंडळाच्या चार बसवर दगडफेक केली.

परभणीत दगडफेक करून चार बस फोडल्या
परभणी : शहरातील विसावा कॉर्नर, एमआयडीसी कॉर्नर, एस.टी. वर्कशॉप व शिवाजी महाविद्यालयासमोर अज्ञात व्यक्तींनी एस.टी. महामंडळाच्या चार बसवर दगडफेक केली. दुपारी १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
शहरातील एमआयडीसी कॉर्नरवर हिंगोलीकडून येत असलेल्या बसवर १० ते १२ जणांनी दगडफेक केली. तसेच विसावा कॉर्नरला परिसरातही एका बसवर दगडफेक झाली. यासह गंगाखेड रोडवरील एस.टी.महामंडळाच्या कार्यशाळेसमोर व वसमतरोडवरील शिवाजी महाविद्यालयाच्या समोर अज्ञातांनी दोन बसवर दगड मारुन नुकसान केले.
या घटनेनंतर जिल्ह्यातील चारही आगारामधील बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत या बस बंद राहतील, अशी माहिती एस.टी.महामंडळाच्या वतीने देण्यात आली.