परभणी: ‘त्या’ घटनेतील चार आरोपीना केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:53 IST2019-06-22T00:52:47+5:302019-06-22T00:53:15+5:30

तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे जाळून मारण्यात आलेल्या मयत सतीश दत्तराव बरसाले खून प्रकरणातील ४ आरोपींना २० जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील सोस येथून अटक करण्यात आली आहे.

Parbhani: Four accused in the 'incident' were arrested | परभणी: ‘त्या’ घटनेतील चार आरोपीना केली अटक

परभणी: ‘त्या’ घटनेतील चार आरोपीना केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे जाळून मारण्यात आलेल्या मयत सतीश दत्तराव बरसाले खून प्रकरणातील ४ आरोपींना २० जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील सोस येथून अटक करण्यात आली आहे.
या खून प्रकरणातील एकूण १२ आरोपीपैंकी पोलिसांनी यापूर्वी ६ आरोपींना अटक केली होती. गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ४ आरोपींना अटक करण्यात आली; परंतु, या घटनेतील अद्यापही दोन आरोपी फरारच असल्याने सेलू पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधात आहेत. आरोपी संपती बाबाराव खोसे, आसाराम बाबाराव खोसे, काशिनाथ बाबाराव खोसे, नामदेव बाबाराव खोसे या चार आरोपींना सेलू पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीपान शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माधव लोकूलवार, अप्पा वºहाडे, रणजित आगळे, गजानन गवळी, बाळू पुरणवाड यांच्या पथकाने केली.

Web Title: Parbhani: Four accused in the 'incident' were arrested