परभणी : रेणुका शुगर परिसरात आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:40 IST2019-04-27T23:40:27+5:302019-04-27T23:40:54+5:30
वीज तारांमध्ये स्पार्किंग होऊन रेणुका शुगर कारखाना परिसरातील गवताला आग लागल्याची घटना २७ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली.

परभणी : रेणुका शुगर परिसरात आग
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): वीज तारांमध्ये स्पार्किंग होऊन रेणुका शुगर कारखाना परिसरातील गवताला आग लागल्याची घटना २७ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली.
कारखान्याच्या परिसरात गोदामाच्या बाजुला मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. शनिवारी या गवताला आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. आगीची माहिती अग्नीशमन दलाला मिळाल्यानंतर खुर्रमखान, शरीफ खान, निखिलेश वाडेकर, बळीराम गावडे आदी कर्मचारी दाखल झाले. अग्नीशमनच्या कर्मचाऱ्यांनी आग अटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आग तात्काळ अटोक्यात आल्याने कारखान्याचे काहीही नुकसान झाले नाही, अशी माहिती कारखाना प्रशासनाने दिली.
दरम्यान, तालुक्यात आगीच्या घटना वाढत आहेत. याच आठवड्यात कब्रस्थान परिसरातही गवताला आग लागली होती.