परभणी : आश्वासनानंतर उपोषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:37 IST2018-04-07T00:37:30+5:302018-04-07T00:37:30+5:30

परभणी : आश्वासनानंतर उपोषणाची सांगता
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : गारपीटग्रस्त भागाची फेर तपासणी करुन १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आश्वासन नायब तहसीलदार वाय.बी. गजभार यांनी दिल्याने येथील तहसील कार्यालयासमोर इसाद येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे.
इसाद येथे फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे ज्वारी, हरभरा, करडई, केळी, पपई, टरबूज आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
शेतात गारांचा खच पडला असतानाही कृषी सहाय्यक, तलाठी यांनी इसाद येथे गारपीटीने नुकसान झाले नाही, असा निरंक अहवाल महसूल प्रशासनाला सादर केला होता. त्यामुळे गारपीटीची मदत शेतकºयांना मिळाली नाही. त्यामुळे इसाद येथील ग्रामस्थांनी ६ एप्रिलपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले. या उपोषणाला आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, रासपचे रत्नाकर गुट्टे, शिवसेनेचे संतोष मुरकुटे, माधव शेंडगे आदींनी पाठिंबा दिला. या उपोषणाची दखल घेऊन नायब तहसीलदार वाय.बी.गजभार यांनी १५ दिवसांत गारपीटग्रस्त भागाची फेर तपासणी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर इसाद येथील शेतकºयांनी उपोषण मागे घेतले. या उपोषणात भगवान सातपुते, भाऊसाहेब भोसले, किशनराव भोसले, श्रीकांत भोसले, रखमाजी भोसले आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.