शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : निम्न दुधना प्रकल्पावर २१७४ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:56 IST

सेलू तालुक्यासह जिल्ह्यातील इतर तीन तालुके आणि जालना जिल्ह्यातील मंठा, परतूर तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या निम्न दुधना प्रकल्पाचे काम आता पूर्णत्वाकडे गेले असून, मार्च २०१९ पर्यंत या प्रकल्पावर २१७४ कोटी ३४ लाख रुपयांचा खर्च झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सेलू तालुक्यासह जिल्ह्यातील इतर तीन तालुके आणि जालना जिल्ह्यातील मंठा, परतूर तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या निम्न दुधना प्रकल्पाचे काम आता पूर्णत्वाकडे गेले असून, मार्च २०१९ पर्यंत या प्रकल्पावर २१७४ कोटी ३४ लाख रुपयांचा खर्च झाला आहे़ वितरिका आणि त्यासाठी लागणाऱ्या भूसंपादनाचे काम शिल्लक असून, हे काम २०१९-२० या वर्षांत प्रस्तावित करण्यात आले आहे़जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांपैकी एक प्रकल्प असलेल्या निम्न दुधना प्रकल्पास १९७८-७९ मध्ये मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली होती़ सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथे दुधना नदीवर हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला़ ४३८़८० मीटर लांबीची दगडी भिंत, ६५८१़२० मीटर लांबीचे माती धरण असलेल्या या धरणाला एकूण २० दरवाजे आहेत़या धरणामुळे २२ गावे पूर्णत: बाधित झाली असून, पाच गावे अंशत: बाधित झाली आहेत़ या गावांचे पुनर्वसनही झाले आहे़ बाधीत झालेल्या गावांमध्ये परभणी जिल्ह्यातील १ आणि जालना जिल्ह्यातील २१ गावांचा समावेश आहे़ या धरणाच्या प्रत्यक्ष कामाला नोव्हेंबर १९९४ मध्ये सुरुवात झाली़ २०१३-१४ च्या पावसाळ्यात धरणात प्रथमच पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात आला़ ३४४़८० दलघमीची क्षमता असलेले हे धरण असून, चार वर्षापूर्वी या धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला होता़ या धरणाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील शेती सिंचनाखाली आली आहे़ एकूण धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यावरून ५३ हजार ३५९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे प्रस्तावित आहे़या प्रकल्पाचा डावा कालवा ६९ किमी लांबीचा असून, या कालव्याची सिंचन क्षमता २८ हजार १८६ हेक्टर एवढी आहे़ तर उजवा कालवा ४८ किमी लांबीचा असून, १६ हजार २९६ हेक्टर सिंचन क्षमता आहे़ उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून ८ हजार ८९७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते़ सद्यस्थितीला उजव्या कालव्याचे काम ४५ किमीपर्यंत पूर्ण झाले असून, उर्वरित काम प्रगतीपथावर आहे़ तर डाव्या कालव्याचे काम ६९ किमीपर्यंत पूर्ण झाले आहे़सद्यस्थितीला या प्रकल्पाच्या मुख्य धरणाच्या भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे़ उजव्या आणि डाव्या कालव्याचे भूसंपादनही पूर्ण झाले आहे़ या प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात १९ ते ३६ किमी दरम्यान रेल्वे क्रॉसिंग येत आहे़ त्यासाठी रेल्वे विभागाकडे पाठपुरावा सुरू असून, या विभागाकडे ४ कोटी ५४ लाख रुपये अग्रीम रक्कमही जमा करण्यात आली आहे़ रेल्वे क्रॉसिंग बॉक्सचे कुशिंगचे काम पूर्ण झाले आहे़ उर्वरित भिंत व इतर कामासाठी रेल्वे विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे़ तसेच कालवा व वितरण व्यवस्थेला छेदणाºया विद्युत वाहिन्या स्थलांतरित करण्याचे काम शिल्लक आहे़ ही कामे पूर्ण झाल्यासच वितरिकेची कामे केली जाणार आहेत़ एकंदर २३४१ कोटी ६७ लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पावर आतापर्यंत २१७४ कोटी ३४ लाख रुपये खर्च झाले असून, काही कामे वगळता धरणाचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे़प्रकल्प पूर्ण होण्यास लागली चाळीस वर्षेच्ब्रह्मवाकडी येथे उभारण्यात आलेल्या निम्न दुधना प्रकल्पाची मूळ प्रशासकीय मान्यता २८ कोटी ४२ लाख रुपये एवढी आहे़ १९७८-७९ या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती़ मात्र मध्यंतरीच्या १६ वर्षामध्ये प्रकल्पाच्या कामाविषयी कोणतीच पावले उचलली गेली नाहीत़च्त्यामुळे १९९५-९६ मध्ये प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आणि प्रकल्पाचा खर्च ४७४ कोटी ६ लाखांवर पोहचला़ या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी ३ सुधारित प्रशासकीय मान्यता द्याव्या लागल्या आहेत़ २००६-०७ मध्ये दुसरी प्रशासकीय मान्यता मिळाली़१६७ कोटींची आवश्यकताच्या प्रकल्पाची काही कामे अजूनही पूर्ण होणे बाकी आहे़ मार्च २०२० पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे़च्त्यासाठी १६७ कोटी ३३ लाख रुपयांची आवश्यकता आहे़ या रकमेत भूसंपादनासाठी ६ कोटी ४३ लाख, मुख्य कालव्यासाठी ३५ कोटी ५६ लाख, वितरण व्यवस्थेसाठी ५१ कोटी ९६ लाख, लाभक्षेत्राच्या विकासासाठी १२८ कोटी १० लाख आणि अनुषंगिक कामे करण्यासाठी ७ कोटी ३८ लाख रुपयांची आवश्यकता आहे़च्ही सर्व कामे मार्च २०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे़५२ हजार हेक्टर जमीन सिंचनाखालीनिम्न दुधना प्रकल्पाच्या माध्यमातून परभणी आणि जालना जिल्ह्यातील ५१ हजार ८४७ हेक्टर जमीन सद्यस्थितीला सिंचनाखाली आली आहे़ उजव्या व डाव्या कालव्याची सिंचन क्षमता ४४ हजार ४८२ हेक्टर एवढी असून, मार्च २०१९ अखेर या कालव्याच्या माध्यमातून ४२ हजार ९५० हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे़ तर उपसा सिंचन योजनेंतर्गत ८ हजार ८९७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे़ अजून १ हजार ५३२ हेक्टर क्षेत्रापर्यंत सिंचन पोहोचविण्याचे उद्दिष्ट शिल्लक आहे़ या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील मंठा, परतूर, सेलू, मानवत, जिंतूर आणि परभणी तालुक्यातील गावे सिंचनाखाली येत आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प