शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

परभणी : जलयुक्तच्या बंधाऱ्याने वाघाळा ग्रामस्थांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:17 IST

दुष्काळी भागात पाणीटंचाईबाबत उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात असतानाच तालुक्यातील वाघाळा येथे मात्र मे महिन्यातही पाणीपुरवठा करणाºया विहिरीला ६० फुटापर्यंत पाणी आहे. त्यामुळे जलयुक्तच्या तीन बंधाºयामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावर्षी उद्भवलाच नसल्याचे ग्रामस्थांमधून बोलल्या जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): दुष्काळी भागात पाणीटंचाईबाबत उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात असतानाच तालुक्यातील वाघाळा येथे मात्र मे महिन्यातही पाणीपुरवठा करणाºया विहिरीला ६० फुटापर्यंत पाणी आहे. त्यामुळे जलयुक्तच्या तीन बंधाºयामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावर्षी उद्भवलाच नसल्याचे ग्रामस्थांमधून बोलल्या जात आहे.पाथरी तालुक्यातील वाघाळा गावची लोकसंख्या ४ हजाराच्या घरात आहे. गावात ६०० कुटुंब गुण्या-गोविंदाने नांदतात. गावातील कुटुंबांना ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा योजनेच्या नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्यासाठी सार्वजनिक जुनी विहीर आहे. या विहिरीचे ८७ फूट खोल खोदकाम झालेले आहे. या विहिरीतून गाव परिसरात बांधण्यात आलेल्या ७० हजार लिटरची १ व १ लाख २५ हजार लिटरची दुसरी असे दोन जलकुंभ उभारण्यात आले आहेत. चार वर्षापूर्वी वाघाळा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे पाठपुरावा करीत जलस्त्रोताचे अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला; परंतु, जलस्त्रोतांचेही पाणी अपुरे पडत असल्याने गावात दोन खाजगी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. चार वर्षापूर्वी निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले.जलयुक्त शिवार योजनेंतर्गत गाव परिसरात ५ सिमेंट बंधारे बांधण्यात आली. ५ पैकी ३ बंधारे पाणीपुरवठा करणाºया विहिरीच्या बाजूला आहेत. त्याच बरोबर भूजल सर्वेक्षण विभागाकडून याच नाल्यावर ५ रिचार्ज शिप्ट घेण्यात आले. याचा फायदा पाणीपुरवठा करणाºया विहिरींना होऊन पाणीपातळीत मोठी वाढ झाली. पाथरी तालुक्यातील बहुतांश गावातील ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत असताना वाघाळा ग्रामस्थांना मात्र सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत दर तिसºया दिवशी नळाद्वारे घरपोच पाणी मिळत असल्याने दुष्काळाच्या दाहकतेची जाणीव सुद्धा झाली नसल्याचे ग्रामस्थांमधून सांगितले जात आहे.जायकवाडीच्या पाण्याचाही फायदा४वाघाळा गाव परिसरातून जायकवाडीच्या डाव्या कालव्याची वितरिका जाते. याच वितरिकेतून जायकवाडीचे पाणी फेब्रुवारी महिन्यात जलयुक्तच्या बंधाºयात सोडण्यात आले होते.४बंधाºयात पाणी आल्याने आपोआपच पाणीपुरवठा करणाºया विहिरीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दुष्काळतही मूबलक पाणी मिळत आहे. त्याच बरोबर पाणीपुरवठा योजनेसोबत गावातील १५ बोअरवेलला भरपूर पाणी आहे.४त्यामुळे पाणीटंचाईच्या आराखड्यात गावातील कोणतीही कामे प्रस्तावित करण्याची वेळ ग्रामपंचायतीला आलीली नाही.पूर्वी गावात पाणीटंचाई जानवत होती. ग्रामस्थांना पाणी मिळविण्यासाठी भटकंतीही करावी लागत होती. मात्र पाणीपुरवठ्यासाठी योग्य नियोजन, जलयुक्त बंधाºयासोबतच जायकवाडीच्या पाण्याचा फायदा झाल्याने गावात ग्रामस्थांना दुष्काळातही मूबलक पाणी मिळत आहे.अर्चना घुंबरे, सरपंच , वाघाळा

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई