परभणी : पावसाचा ताण पडल्याने पोळ्यावर दुष्काळाचे ढग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:21 IST2019-08-29T00:21:31+5:302019-08-29T00:21:41+5:30
‘पोळा अन् पाऊस झाला भोळा’ अशी जुनी म्हण आहे. त्यामुळे पंधरा ते वीस दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस आता परत येण्याची शक्यता मावळली असून, अशा निराशेच्या वातावरणात पोळा सण साजरा करण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.

परभणी : पावसाचा ताण पडल्याने पोळ्यावर दुष्काळाचे ढग
लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी (परभणी) : ‘पोळा अन् पाऊस झाला भोळा’ अशी जुनी म्हण आहे. त्यामुळे पंधरा ते वीस दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस आता परत येण्याची शक्यता मावळली असून, अशा निराशेच्या वातावरणात पोळा सण साजरा करण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.
कृषी संस्कृतीतीत महत्त्वाचा आणि वर्षभर शेतात राबणाºया बैलांचा सन्मान करणारा हा सण ३० आॅगस्ट रोजी साजरा केला जात आहे. पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजण्याच्या अवस्थेत आहेत. एकीकडे खरीप हंगाम हातचा जाण्याची भीती निर्माण झाली असताना दुसरीकडे पोळा सण साजरा करावा लागत आहे. पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैलांना आंघोळ घातली जाते. मात्र बैलांना धुण्यासाठीही पूर्णा नदी किंवा ओढ्यात पाणीसाठा नाही. वर्षभर ज्यांच्या मानेवर जू असतो, अशा बैलांचे खांदे मळण्यात येतात. पोळ्याला खांदे मळण्याचे विशेष महत्त्व असते. त्यानंतर पुन्हा एकदा बैलांना आंघोळ घातली जाते. गोंडे, फुगे, चंगाळी, झुली, बाशिंग बांधून बैलांचा साज केला जातो. गावातील मारुतीच्या पारावर जाऊन प्रदक्षिणा घातली जाते. घरी गाय व बैलांची एकत्रित पूजा करुन बैलांना पुरण पोळी खाऊ घातली जाते. ‘यंदा बºयापैकी पीक येऊ दे’ असा आशिर्वादही घेतला जातो. मात्र यावर्षी पाऊस नसल्याने सर्वत्र शांतता दिसून येत आहे. साध्या पद्धतीने पोळ्याचा सण साजरा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
येलदरी येथील आठवडी बाजारात पोळ्यानिमित्त बैलांचा साज खरेदी करण्यासाठी गर्दी झाली खरी. मात्र दुष्काळ आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांना साज खरेदी करताना आखडता हात घ्यावा लागत आहे.
पोळा सणामुळेच चिंतेत पडली भर
४पोळा सणापर्यंत पाऊस पडण्याची शाश्वती असते़ मात्र पोळ्याचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला तरी पावसाचा पत्ता नसल्याने शेतकºयांच्या चिंता आणखी वाढल्या आहेत़ या सणानंतरही पाऊस होईल अशी अपेक्षाही नसते़ त्यामुळे शेतात उभी असलेली पिके कशी जगवायची? याची चिंता शेतकºयांना लागली आहे़