Parbhani: Drinking licenses for 3 lakh citizens | परभणी : १ लाख नागरिकांनी घेतले दारु पिण्याचे परवाने
परभणी : १ लाख नागरिकांनी घेतले दारु पिण्याचे परवाने

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातून एप्रिल ते डिसेंबर २०१९ या ८ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ९५ हजार २२४ जणांनी दारु पिण्यासाठीचा अधिकृत परवाना घेतला असून याद्वारे प्रशासनास ३ लाख १२ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
मुंबई दारुबंदी कायदा १९४९ व त्या खालील नियम, विनियम व आदेश या अनुषंगाने दारु पिणाऱ्या व बाळगणाºया व्यक्तीस शासनाचा परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अजीवन परवान्यासाठी १ हजार रुपये शुल्क घेण्यात येते. तर वार्षिक परवान्यासाठी १०० रुपये आणि १ दिवसीय देशी मद्य सेवन परवान्यासाठी २ रुपये व एक दिवसीय विदेशी मद्य सेवन परवान्यासाठी ५ रुपये शुल्क राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेण्यात येते. एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधीत परभणी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ९५ हजार २२४ नागरिकांनी दारु पिण्याचे परवाने घेतले आहेत.
त्यामध्ये १२ जणांनी अजीवन परवाना तर १२ जणांनी वार्षिक परवाना घेतला आहे. ५९ हजार जणांनी एक दिवसीय देशी मद्य सेवन परवाना घेतला आहे. तर ३६ हजार २०० जणांनी एक दिवसीय विदेशी मद्य सेवन परवाना घेतला आहे. या चार परवान्यांच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क विभागाला ३ लाख १२ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.
उत्पादन शुल्क विभागाची ३६ प्रकरणांमध्ये कारवाई
४राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधीत एकूण ३६ प्रकरणात नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात आली. त्यामध्ये देशी दारुचे १०, विदेशी दारुचे ९ दुकान, ११ परमीट रुम, चार बिअर शॉपींचा समावेश आहे.
४ यातील ३० प्रकरणे निकाली काढण्यात आले असून ६ प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणांमध्ये तडजोडीअंती ११ लाख ४० हजार रुपयांचा महसूल राज्य उत्पादन शुल्क विभागाने वसूल केला असल्याची माहिती या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Parbhani: Drinking licenses for 3 lakh citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.