खाकी वर्दीची ओढ! पहाटे ४:३० पासून परभणी पोलीस मुख्यालयात तरुणाईचा 'धाव' सुरू
By राजन मगरुळकर | Updated: February 14, 2026 13:58 IST2026-02-14T13:58:20+5:302026-02-14T13:58:51+5:30
परभणी जिल्हा पोलीस भरती मैदानी चाचणीला सुरुवात; पहिल्या दिवशी ३८९ उमेदवार हजर

खाकी वर्दीची ओढ! पहाटे ४:३० पासून परभणी पोलीस मुख्यालयात तरुणाईचा 'धाव' सुरू
परभणी : जिल्हा पोलीस दलातील ९७ जागासाठी शनिवारी पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी ५०० उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलावण्यात आले होते. यापैकी ३८९ उमेदवार हजर होते. तर १११ उमेदवार गैरहजर होते.
जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस मुख्यालय मैदानावर शनिवारी पहाटे साडेचार वाजता भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. दुपारी बारा वाजेपर्यंत या भरती प्रक्रियेत गोळाफेक १०० मीटर धावणे, सोळाशे मीटर धावणे या तीन प्रकारातील चाचणी घेण्यात आल्या. तर महिलांसाठी ८०० मीटर धावणे, गोळाफेक आणि शंभर मीटर या चाचणी होत्या.
पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी , अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्यासह उप विभागीय पोलिस अधिकारी दीपक कुमार वाघमारे, पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील आणि सर्व ठाणेदार, कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. ही भरती प्रक्रिया ५ मार्च पर्यंत सुरू राहणार आहे.
आजचे एकूण विद्यार्थी ५००
उपस्थित विद्यार्थी ३८९
गैरहजर विद्यार्थी १११
गोळाफेक ३ चान्स ८.५०
१०० मीटर धावणे : ११.५० सेकंद
सोळाशे मीटर धावणे : ५.१० मीन
आठशे मीटर धावणे : २.५०
एकूण उमेदवार : १० हजार ६७९