शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

परभणी जिल्हा रुग्णालय : वर्षभरात विषबाधेच्या ६२० रुग्णांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:41 AM

किटक नाशके व इतर पदार्थामधून विषबाधा झालेल्या ६६३ रुग्णांनी मागील वर्षभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतले असून, त्यापैकी ६२० रुग्णांना जीवदान मिळाले आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयात योग्य वेळी उपचार झाल्यामुळे या रुग्णांचे प्राण वाचले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : किटक नाशके व इतर पदार्थामधून विषबाधा झालेल्या ६६३ रुग्णांनी मागील वर्षभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतले असून, त्यापैकी ६२० रुग्णांना जीवदान मिळाले आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयात योग्य वेळी उपचार झाल्यामुळे या रुग्णांचे प्राण वाचले आहेत़परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध आजारावर उपचार घेण्यासाठी ग्रामीण भागातून रुग्णांचे प्रमाण अधिक आहे़ अपघात विभाग, अस्थिरोग विभाग, जळित विभाग आदी विभागांमधून रुग्णांवर उपचार केले जातात़ त्याचबरोबर विषबाधीत रुग्णांवरही रुग्णालयात अद्यायवत सुविधांचा वापर करून उपचार केले जातात़ मागील काही वर्षांपासून शेतीमध्ये नुकसान होत असल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे़ बहुतांश आत्महत्या विष प्राशन करून होतात़ शेतकरी आत्महत्यांबरोबरच घरगुती कलहातून विष घेण्याचे प्रकारही घडलेले आहेत़ तर अनेक वेळा नजरचुकीने पोटात विष जाऊन विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ या सर्व प्रकरणांमध्ये उपचाराची जबाबदारी जिल्हा रुग्णालयावर येऊन ठेपते़ ग्रामीण भागातून दाखल झालेल्या या रुग्णांवर तातडीने उपचार करून त्यांना जीवदान देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जातात़एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या एक वर्षात जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ६६३ रुग्ण विषबाधेवर उपचार करण्यासाठी दाखल झाले होते़ या रुग्णांना तातडीने उपचार मिळाले़ त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी जास्तीत जास्त रुग्णांचा जीव वाचविण्यात यशस्वी झाले आहेत़एका वर्षात दाखल झालेल्या ६६३ रुग्णांपैकी केवळ ४३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, उर्वरित सर्व रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळाल्याने ते पूर्ववत आपले जीवन जगत आहेत़जिल्हा सामान्य रुग्णालयातील विषबाधेच्या प्रकरणात मिळालेली आकडेवारी पाहता कीटक नाशकांमधून विषबाधा होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. आहे़ ग्रामीण भागामध्ये सर्वसाधारणपणे शेतीच्या कामांना प्राधान्य दिले जाते़ ही कामे करीत असताना पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकांचा वापर केला जातो़ हे कीटकनाशक फवारण्याचे जोखमीचे काम शेतकऱ्यांनाच करावे लागते़ यातून अनेक वेळा कीटकनाशक पोटात जाऊन विषबाधा होण्याचे प्रकार होतात़ जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील वर्षभरामध्ये कीटकनाशक पोटात गेल्याने ४१६ जणांना विषबाधा झाली होती़ २४७ रुग्ण हे कीटकनाशकाव्यतिरिक्त विष पोटात गेल्याने दाखल झाले होते़ ही आकडेवारी लक्षात घेता कीटकनाशकांचा वापर हानिकारकच असल्याचे समोर येत आहे़एका महिन्यात ८५ रुग्ण दाखलजिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये अपघाताबरोबर इतर आजारांच्या रुग्णांची संख्या अधिक असली तरी विषबाधा झाल्याचे प्रमाणही नजरेत भरण्याएवढे आहे़ मागील महिन्यात सामान्य रुग्णालयामध्ये ८५ रुग्णांवर विषबाधेचे उपचार करण्यात आले़ रॉकेल, वेगवेगळ्या प्रकारची विषारी औषधी, उंदिर मारण्याचे औषध, झुरळ, डास, मुंगी असे कीटक मारण्याच्या रसायनांंमधून विषबाधा झाल्याचे उपचारा दरम्यान निष्पन्न झाले आहे़ एका महिन्याचा विचार करता ८५ पैकी केवळ ५ रुग्णांवर मृत्यू ओढावला तर उर्वरित ८० रुग्णांना जीवदान मिळाले आहे़ योग्य वेळी योग्य उपचार झाल्याने या रुग्णांना जीवदान मिळाले आहे.विषबाधेच्या घटनांत वाढमागील काही वर्षांपासून जिल्हाभरात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे़ त्याचबरोबर कौटुंबिक कलहातूनही आत्महत्या करण्यासाठी विष प्राशन केले जाते़ अशा वेळी रुग्णांचे नातेवाईक तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतात़ विष पोटात गेल्याने विषबाधा असो की विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणे असो़ जिल्हा सामान्य रुग्णालयात मात्र या रुग्णांवर उपचार केले जातात़ सामान्य रुग्णालयात विषबाधेने दाखल झालेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता विषबाधेचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे़ रुग्णालयातून जीवदान मिळणाºया रुग्णांची संख्याही अधिक असल्याने सामान्य रुग्णालयातच उपचार घेणाºयांची संख्या वाढत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीParabhani civil hospitalजिल्हा रुग्णालय परभणीPoliceपोलिस