परभणी : २०० अनाथ बालकांना पोषणआहार वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:42 IST2018-09-22T00:40:38+5:302018-09-22T00:42:45+5:30
येथील होमियोपॅथिक अकादमी आॅफ रिसर्च अॅण्ड चॅरिटीज या संस्थेच्या वतीने लोकसहभागातून जमा झालेला पोषण आहार राज्यातील विविध बालगृहांमधील २०० अनाथ मुलांना नुकताच वाटप करण्यात आला.

परभणी : २०० अनाथ बालकांना पोषणआहार वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील होमियोपॅथिक अकादमी आॅफ रिसर्च अॅण्ड चॅरिटीज या संस्थेच्या वतीने लोकसहभागातून जमा झालेला पोषण आहार राज्यातील विविध बालगृहांमधील २०० अनाथ मुलांना नुकताच वाटप करण्यात आला.
होमियोपॅथिक अकादमीच्या वतीने एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या अनाथ बालकांसाठी मागील १० वर्षापासून काम केले जाते. या बालकांच्या पूनर्वसनाबरोबरच आरोग्य आणि जनजागृतीविषयक काम संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
या अंतर्गत ‘बाप्पांचा नैवद्य अनाथ बालकांच्या सदृढ, निरोगी आरोग्यासाठी’ ही मोहीम राबवित सेवाभावी नागरिकांना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जमा झालेल्या निधीतून दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या अनाथ बालकांना पोषण आहार वाटप करण्यात आला. त्यात पारंपारिक पोषण आहाराचा समावेश होता. या बालकांना शेंगदाण्याच्या लाडूच्या १२० भरण्या वितरित करण्यात आल्या.
लातूर येथील सेवालय प्रकल्प, बीड येथील इंन्फ्रंट इंडिया संस्था, अकोला येथील सर्वोदय एड्स बालगृह, पंढरपूर येथील पालवी प्रकल्प या संस्थेमध्ये मदतीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी एचएआरसीचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक, डॉ.शिवा आयथॉल, डॉ. विवेक कुलकर्णी, सॅम मायक्रोबॉयलॉजी ग्रुपचे विद्यार्थी तसेच हितेश शाह यांचे सहकार्य लाभले.
गुळ आणि शेंगदाणे, खारीक हे पदार्थ प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी उपयोगी ठरतात. यातून मुलांचे हिमोग्लोबीन, कॅलेशियम वाढीसाठी मदत होईल. शिवाय प्रतिकारशक्ती वाढण्यासही हे पदार्थ पोषक ठरत असल्याने हा पोषण आहार एचआयव्ही बाधित तसेच अनाथ बालकांसाठी वितरित केला असल्याचे डॉ.पवन चांडक यांनी सांगितले.