शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

परभणी: मतदानाच्या टक्केवारीवरुन राजकीय वर्तूळात रंगताहेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:56 PM

परभणी लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघामध्ये सरासरी ६३.१९ टक्के मतदान झाले. २०१४ मध्ये ६४.४४ टक्के मतदान झाले होते. यावर्षी सव्वा टक्के मतदानात घट झाल्याने मतदानाची टक्केवारी चर्चेचा विषय बनली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघामध्ये सरासरी ६३.१९ टक्के मतदान झाले. २०१४ मध्ये ६४.४४ टक्के मतदान झाले होते. यावर्षी सव्वा टक्के मतदानात घट झाल्याने मतदानाची टक्केवारी चर्चेचा विषय बनली आहे.परभणी लोकसभा मतदारसंघ १९९८ चा अपवाद वगळता १९९१ पासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. १९९१ मध्ये या मतदारसंघात फक्त ४६.३३ टक्के मतदान झाले होते. १९९६ मध्ये ४८.६२ टक्के तर १९९८ मध्ये ५९.७४ टक्के मतदान झाले होते. १९९९ मध्ये ६६.८९ टक्के मतदान झाले. २००४ मध्ये ५८.४९ टक्के तर २००९ मध्ये ५४.८ टक्के मतदान झाले होते. २०१४ मध्ये यामध्ये जवळपास १०. ३६ टक्के मतांची वाढ होऊन ६४.४४ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे गेल्यावेळी ज्या दिवशी मतदान झाले होते. त्या दिवशी उन्हाचा पारा ४२ अंश होता. या कडक उन्हातही मतदानाची टक्केवारी वाढली होती. यावर्षी १८ एप्रिल रोजी मतदान झाले. त्यादिवशी जिल्ह्याचे तापमान ३९ अंश होते. तरीही मतदानाची टक्केवारी वाढली नाही. मतदानाची टक्केवारी घटल्याने या टक्केवारीचा फटका कोणाला बसेल? याची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तूळात जोमाने सुरु झाली आहे. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर अनिश्चितेचा खेळ संपून परभणी मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व अबाधित राहील की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला धोबीपछाड देऊन इतिहास निर्माण करेल, हे स्पष्ट होणार आहे.या निवडणुकीत अनेक अनपेक्षित गोष्टी पहावयास मिळाल्या. दिग्गज राजकीय नेत्यांच्या भूमिकांमध्ये अकलनीय बदल झाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांचे राजकीय भवितव्य ठरविणार आहे.परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय जाधव, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांच्यासह १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १९९८ चा अपवाद वगळता ३० वर्षांंपासून या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय निकाल लागतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.मागच्या निवडणुकीत शिवसेनेला झाला फायदा२००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये १०.३६ टक्के मतदान वाढले होते. या वाढीव मतदानाचा शिवसेनेला झाला फायदा झाल्याचे दिसून आले होते. यंदाची घट कोणासाठी घातक ठरते ते बघावे लागेल.कुठेमतमोजणीसर्व टप्प्यातील निवडणुका पार पडल्यानंतर २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. परभणी लोकसभा निवडणुकतील मतमोजणी वसंतराव नाईक़ मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात होईल.१९ यंत्र बदललेपरभणी- मतदान प्रक्रियेत यंत्रात बिघाड झाल्याने १९ ठिकाणचे मतदान यंत्र बदलण्यात आले. त्यामध्ये जिंतूर, गंगाखेड, पाथरी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ४ तर परभणी १ आणि परतूर व घनसावंगी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ३ मतदान यंत्र बदलण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीVotingमतदान